Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले

क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले

Crypto Fraud Alert : हॅकर्सनी Axie Infinity या ऑनलाइन व्हिडीओ गेमच्या निर्मात्यांकडील स्काय माविस आणि अ‍ॅक्सी DAO कॅम्प्युटर्सचा वापर केला, ज्यांना नॉड्स म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:53 PM2022-03-30T13:53:39+5:302022-03-30T13:54:55+5:30

Crypto Fraud Alert : हॅकर्सनी Axie Infinity या ऑनलाइन व्हिडीओ गेमच्या निर्मात्यांकडील स्काय माविस आणि अ‍ॅक्सी DAO कॅम्प्युटर्सचा वापर केला, ज्यांना नॉड्स म्हणतात

crypto money heists hackers steal 5 crore from a blockchain | क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले

क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले

नवी दिल्ली : ब्लॉकचेन आधारित क्रिप्टो करन्सीबद्दल मोठे दावे केले जात होते की क्रिप्टोकरन्सी हॅक करणे शक्य नाही. हॅकर्सनी आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टो चोरी केली आहे. हॅकर्सनी Axie Infinity या लोकप्रिय ऑनलाइन व्हिडिओ गेमशी जोडलेल्या ब्लॉकचेन नेटवर्कमधून जवळपास 600  मिलियन डॉलर ( 4,543 कोटी रुपये) चोरले आहेत.

हॅकर्सनी Axie Infinity या ऑनलाइन व्हिडीओ गेमच्या निर्मात्यांकडील स्काय माविस आणि अ‍ॅक्सी DAO कॅम्प्युटर्सचा वापर केला, ज्यांना नॉड्स म्हणतात. हे एक ब्रिज सॉफ्टवेअरला सपोर्ट करते, जे लोकांना इतर नेटवर्कवर टोकन वापरण्याची परवानगी देते. या रोनिन ब्रिजवर हॅकर्सनी हल्ला केला आहे. दरम्यान, रोनिन हे Axie Infinity चे ब्लॉकचेन नेटवर्क आहे.

रोनिनच्या म्हणण्यानुसार, हॅकर्सनी दोन व्यवहारांमध्ये 173,600 इथर किमतीचे रोनिन ब्रिज आणि 25.5 मिलियन USDC टोकन गायब केले. ही चोरी 23 मार्च रोजी झाली होती, परंतु मंगळवारी याबाबत माहिती मिळाली. चोरीच्या वेळी या व्यवहारांचे मूल्य 545 मिलियन डॉलर इतके होते, परंतु मंगळवारच्या किमतींवर आधारित, अंदाजे 615 मिलिन डॉलर होते. त्यामुळे ही क्रिप्टोमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी बनली आहे.

दरम्यान, गेमच्या ब्लॉकचेन नेटवर्कवरील हल्ले हे दिसून आले की ब्रिजमध्ये समस्या आहे. यासोबतच नेटवर्कच्या कॉम्प्युटर कोडचेही ऑडिट झालेले नाही, याचा फायदा हॅकर्सकडून घेतला जात आहे. कोट्यवधी डॉलर्सचे व्यवहार करणारे अनेक ब्रिज असल्याने ही नेटवर्क नेमकी कोण चालवत आहे, असा प्रश्नही यामुळे उपस्थित होतो.

Axie Infinity मध्ये वापर होणाऱ्या टोकनच्या किंमतीत घसरण
मंगळवारी हॅकिंगचा खुलासा झाल्यानंतर, रोनिन ब्लॉकचेनवर वापरल्या जाणार्‍या टोकन रॉनची किंमत जवळपास 22% कमी झाली. AXS, Axie Infinity मध्ये वापरलेले टोकन, 11% इतके घसरले. रोनिनने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की चोरी झालेल्या निधीचा मागोवा घेण्यासाठी ते प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आणि ब्लॉकचेन ट्रेसर चैनॅलिसिसच्या संपर्कात आहे. रोनिनने असेही म्हटले आहे की ते लॉ इन्फोर्समेंटसोबत काम काम करत आहेत.

Web Title: crypto money heists hackers steal 5 crore from a blockchain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.