नवी दिल्ली : आभासी चलन अर्थात 'क्रिप्टोकरन्सी' मध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच आहे. शुक्रवारीही जगातील सर्वात मोठे 'क्रिप्टो चलन असलेले बिटकॉइन जवळपास ७.५ टक्क्यांनी खाली घसरून ३८,५९२ डॉलरवर आले आहे. तर इथिरियममध्ये ८.९९ टक्क्यांची घसरण होत ते २,८७१ डॉलरवर आले आहेत. जानेवारी महिन्यात यामध्ये १८ टक्केपेक्षा अधिक घसरण झाली आहे.घसरणीमुळे क्रिप्टोकरन्सीच्या भांडवली मूल्यावर झाला असून, हे मूल्य २ लाख कोटी डॉलरच्या खाली आले आहे. डॉगीकॉईन (७.६४), बिनान्स (१०.११), सोलाना (८.९९), एक्सआरपी (७.८८) यांच्यामध्येही घसरण पहायला मिळाली.का होतेय घसरण?गेल्या काही दिवसांत क्रिप्टोकरन्सीत घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या भूमिकेबद्दलची अनिश्चितता आणि अनेक नियामक निर्णय. यामुळे जगभरातील डिजिटल मालमत्तेच्या जलद वाढीबद्दल शंका निर्माण झाली आहे. असे असताना रशियाच्या सेंट्रल बँकेने बिटकॉईन आणि क्रिप्टो ट्रेडिंगवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. भारतामध्ये यासाठी कठोर धोरणे आखली जात आहेत. याचाच परिणाम म्हणून क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण पहायला मिळत आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 6:04 AM