Bitcoin Price: जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत यावर्षी 50 हजार डॉलरच्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. त्याचप्रमाणे, बिटकॉइनची किंमत पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2024 पर्यंत 1.20 लाख डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. ब्रोकरेज फर्म स्टँडर्ड चार्टर्डने हा अंदाज व्यक्त केला. बिटकॉइनच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीनंतर बिटकॉइन मायनर्सना प्रोत्साहन मिळू शकते, असं ब्रोकरेज फर्मचं म्हणणं आहे.
स्टँडर्ड चार्टर्डने एप्रिलमध्ये अंदाज व्यक्त केला होता की बिटकॉइनची किंमत 2024 च्या अखेरीस एक लाख डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते. दरम्यान, बिटकॉइनची किंमत आणखी 20 टक्क्यांनी वाढू शकते, असं मत बँकेचे वरिष्ठ एफएक्स विश्लेषकांपैकी एक ज्योफ केंड्रिक यांनी व्यक्त केलं.
80 टक्क्यांपर्यंत वाढया वर्षाच्या सुरुवातीपासून बिटकॉइनच्या किमतीत 80 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. परंतु 30,200 डॉलर्सची सध्याची किंमत क्रिप्टो टोकनच्या 69,000 डॉलर्सच्या ऑल टाईम हायच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, या क्रिप्टो टोकनची किंमत 69,000 डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती.