नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत जगाला इशारा दिला आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत बोलताना, त्या म्हणाल्या की, आर्थिक तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना क्रिप्टोकरन्सीचा वापर मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाच्या निधीसाठी केला जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
आएमएफद्वारे आयोजित एका उच्चस्तरीय चर्चेत भाग घेताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जोपर्यंत क्रिप्टो मालमत्तेचे व्यवहार खासगी माध्यमातून होत राहतील तोपर्यंत त्यांचे नियमन करणे खूप कठीण असेल. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल चलनांद्वारे देशांमधील व्यवहार अधिक प्रभावी होतील, असे त्या म्हणाल्या.
सीतारमण म्हणाल्या की, क्रिप्टोकरन्सीवरील तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी जागतिक दृष्टिकोन होईपर्यंत मनी लाँड्रिंगचा धोका कायम राहील. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आम्ही क्रिप्टो मालमत्तेच्या व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येईल. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी एक टक्का कर कापला जाईल, त्यामुळे क्रिप्टो कोण विकते आणि घेते आहे हे लक्षात येणार आहे.
क्रिप्टोकरन्सीमुळे दहशतवाद्यांना निधी; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिला मोठा इशारा
सीतारमण म्हणाल्या की, क्रिप्टोकरन्सीवरील तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी जागतिक दृष्टिकोन होईपर्यंत मनी लाँड्रिंगचा धोका कायम राहील.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:39 PM2022-04-20T12:39:53+5:302022-04-20T12:40:26+5:30