जगभरातील तरुणांना आकर्षित करत असलेले क्रिप्टोकरन्सीचा खेळ शनिवारी अनेकांचे कोट्यवधींचे नुकसान करून गेला. एकाच दिवसात बिटकॉइन आणि इथेरियमसर सर्वच प्रकारच्या महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी धडाम कोसळले.
या सर्व कॉइनची किंमत वेगाने खाली आली. मात्र दुपारनंतर त्यात सुधारणा होत गेली. रात्री उशिरा बिटकॉइनची किंमत १० टक्के घसरलेली होती.
कारण...
कोरोनाचा नवा विषाणू वेगाने पसरू लागला आहे. अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडेल की काय, अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांत जगभरातील शेअर बाजारांमध्येही भीतीचे वातावरण आहेत. त्यामुळे शेअर बाजारही कोसळले होते. अनेक देश क्रिप्टोकरन्सीला अधिकृत करन्सी मानण्यास नकार देत आहेत. जगभरात महागाई वाढत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या काही दिवसांमध्ये पतधोरण आणखी कडक करू शकते. २४० कोटी डॉलर्स एवढी रक्कम क्रिप्टो मार्केटमधून काढून घेण्यात आली आहे. ७ डिसेंबर २०२० नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी विक्री पाहायला मिळू लागली आहे.