Lokmat Money > बिझनेस न्यूज > Cryptocurrency Market: “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा

Cryptocurrency Market: “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा

Cryptocurrency Market: जी २० बैठकीदरम्यान निर्मला सीतारामन यांनी केलं मोठं वक्तव्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 02:38 PM2023-04-15T14:38:20+5:302023-04-15T14:39:59+5:30

Cryptocurrency Market: जी २० बैठकीदरम्यान निर्मला सीतारामन यांनी केलं मोठं वक्तव्य.

Cryptocurrency Market need to give Immediate attention to this Finance Minister Nirmala Sitharaman's big warning on cryptocurrencies g20 meeting america | Cryptocurrency Market: “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा

Cryptocurrency Market: “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा

Cryptocurrency Market: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत सतर्क केलं आणि प्रत्येकानं त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं. अर्थव्यवस्थेचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि क्रिप्टो मालमत्तेवर झालेला फायदाही नुकसानीचा ठरू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. वॉशिंग्टन डीसीमध्ये जी-२० बैठकीदरम्यान अर्थमंत्र्यांनी यावर भाष्य केलं.

निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी आयएमएफ मुख्यालयात जी २० मध्ये सहभागी असलेले अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्यासमवेत ‘क्रिप्टो असेट्स मॅक्रोफायनान्शियल इम्प्लिकेशन्स’ या विषयावरील विचारमंथन सत्रात भाग घेतला. यादरम्यान त्यांनी क्रिप्टोकरन्सीबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. याबाबत सर्वसमावेशक नियमावलीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या. भारत सध्या जी २० चं अध्यक्षपद भूषवत आहे.

जी २० देशांमध्ये क्रिप्टोची चर्चा
क्रिप्टोकरन्सीबाबत जी २० देशांमध्ये सध्या तीव्र चर्चा सुरू आहे, ज्यामुळे या देशांमध्ये क्रिप्टो ही प्रमुख समस्या म्हणून उदयास आली आहे. अनेक देश याबाबत सहमत आहेत, तर काही देशांचं मत वेगळं आहे. तज्ज्ञांनीही या विषयावर माहिती दिली आहे. “जी २० नं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्डाच्या (FSB) धोरण आणि नियामक फ्रेमवर्कचे प्रमुख घटक पुढे आणण्याच्या कामाची कबुली दिली आहे,” असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

सिंथेसिस पेपरची गरज
क्रिप्टो मालमत्तेच्या मायक्रोइकॉनॉमिक आणि नियामक पैलूंना एकत्रित करेल अशा सिंथेसिस पेपरची आवश्यकता आहे. जी २० सदस्यांमध्ये क्रिप्टो मालमत्तेवर जागतिक नियमन असावं. यामध्ये अर्थव्यवस्थेतील जोखीम आणि गुंतवणुकीची जोखीम इत्यादींची काळजी घेतली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: Cryptocurrency Market need to give Immediate attention to this Finance Minister Nirmala Sitharaman's big warning on cryptocurrencies g20 meeting america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.