Lokmat Money > बिझनेस न्यूज > सीटीएसमुळे यापुढे बँकांमधील धनादेश हाेणार झटपट क्लीअर

सीटीएसमुळे यापुढे बँकांमधील धनादेश हाेणार झटपट क्लीअर

‘सीटीएस’ ही धनादेश क्लीअर करण्याची यंत्रणा आहे. जमा केलेला चेक एका शाखेतून दुसरीकडे न्यावा लागत नाही. जुन्या यंत्रणेमध्ये धनादेश हा जारी करणाऱ्याच्या बँकेत पाठविण्यात येताे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:57 AM2021-02-11T03:57:26+5:302021-02-11T07:11:30+5:30

‘सीटीएस’ ही धनादेश क्लीअर करण्याची यंत्रणा आहे. जमा केलेला चेक एका शाखेतून दुसरीकडे न्यावा लागत नाही. जुन्या यंत्रणेमध्ये धनादेश हा जारी करणाऱ्याच्या बँकेत पाठविण्यात येताे.

CTS will make bank checks instantly clearer | सीटीएसमुळे यापुढे बँकांमधील धनादेश हाेणार झटपट क्लीअर

सीटीएसमुळे यापुढे बँकांमधील धनादेश हाेणार झटपट क्लीअर

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘चेक ट्रान्झेक्शन सिस्टिम’ची (सीटीएस) व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धनादेश क्लीअरिंग झटपट हाेणार आहे. नवे नियम या वर्षी सप्टेंबरपासून लागू हाेण्याची शक्यता आहे.

‘सीटीएस’ ही धनादेश क्लीअर करण्याची यंत्रणा आहे. जमा केलेला चेक एका शाखेतून दुसरीकडे न्यावा लागत नाही. जुन्या यंत्रणेमध्ये धनादेश हा जारी करणाऱ्याच्या बँकेत पाठविण्यात येताे. त्यामुळे त्यानंतर तो क्लियर होऊन पैसे जमा हाेण्यास वेळ लागताे. ‘सीटीएस’मुळे ही प्रक्रिया झटपट हाेईल. 
चेक एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचा बँकांचा खर्चही वाचणार आहे. सध्या १ लाख ५० हजार बँक शाखा या यंत्रणेत जाेडण्यात आल्या आहेत. आता उर्वरित १८ हजार शाखादेखील लवकरच जाेडल्या जातील. 

धनादेशाचे महत्त्व कायम
गेल्या काही वर्षांत ऑनलाइन पेमेंट वाढले. यूपीआय तसेच आयएमपीएस यासारख्या यंत्रणेमुळे लगेच पैसे ट्रान्सफर हाेतात. मात्र, या युगातही धनादेशाचे महत्त्व कायम आहे. ठरावीक कामांसाठी धनादेश आवश्यक असतात. त्यामुळे ही यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला.

Web Title: CTS will make bank checks instantly clearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.