नवी दिल्ली : देशभरात १ एप्रिल २०२० पासून ‘भारत स्टेज ४’ या प्रदूषण निकषांत मोडणाऱ्या गाड्यांची विक्री व आरटीओ नोंदणीसुद्धा करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या तयार होणाºया किंवा सध्या रस्त्यावर धावणाºया गाड्या एप्रिल २०२० नंतर ‘रीसेल’सुद्धा करता येणार नाहीत.‘भारत स्टेज ४’ या प्रदूषणाच्या निकषांत रस्त्यावर धावणाºया गाड्यांमधून जास्तीत जास्त किती प्रदूषण व्हावे, याची मर्यादा ठरविली आहे. त्यानुसार उत्पादकांना त्यापेक्षा कमी प्रदूषणाचे इंजिन वाहनाला बसवावे लागते. १ एप्रिल २०१७ पासून हे निकष लागू झाले आहेत. पण ‘भारत स्टेज ५’ निकषांची अंमलबजावणी न करता थेट ‘भारत स्टेज ६’ निकष लागू करण्याचा निर्णय केंद्राने २०१६ मध्ये घेतला आहे. वाहन उत्पादकांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.न्या. मदन लोकूर यांच्या नेतृत्त्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने यासंबंधी निर्णय दिला. देशभरात १ एप्रिल २०२० पासून फक्त ‘भारत स्टेज ६’ निकषांमधील वाहनांचीच विक्री करता येणार आहे. या अंमलबजावणीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची वाहन उत्पादकांची विनंतीही न्यायालयाने फेटाळली.
सध्याच्या गाड्यांची विक्री एप्रिल २०२० पासून होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:04 AM