नवी दिल्ली : महागाई कमी होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती उतरत आहेत. याचा लाभ ग्राहकांना देण्याची जोरदार तयारी गतिमान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) कंपन्यांनी
चालविली आहे.
पाकीटबंद वस्तूंचे वजन वाढवून किमती कमी करण्यात येत आहेत. विक्री वाढविण्यासाठी कंपन्यांनी हे उपाय चालविले आहेत.
या कंपन्यांनी घटविल्या किमती
- ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे वरुण बेरी यांनी सांगितले की, आम्ही किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. पुढेही किमती कमी केल्या जातील.
- पार्ले प्रॉडक्ट्सचे
मयंक शाह यांनी सांगितले की, आम्ही आमच्या पाकिटांचे दर १० ते १५ टक्क्यांनी कमी केले आहेत. तसेच वस्तूचे प्रमाण वाढविले आहे.
‘एनआयक्यू’ आकडेवारी
- मागील ६ तिमाहींत एफएमसीजी वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. मार्चच्या तिमाहीत मात्र ग्रामीण मागणी वाढल्यामुळे विक्रीत वाढ झाली.
- कच्चा माल महागल्यामुळे गेल्या वर्षी कंपन्यांनी किंमत वाढवितानाच पाकिटांचे वजन कमी केले होते. मागील २ महिन्यांत मात्र कंपन्यांनी किमती १० ते १५ टक्के कमी केल्या आहेत.
- २० रुपये प्रतिलिटर मोहरी तेल स्वस्त. १७-२५% डिटर्जंटचे वजन वाढविले. किमतीत १०-२५% कपात.
दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त
मार्च २०२२ ४.२%
जून २०२२ ०.७%
सप्टेंबर २०२२ ०.६%
डिसेंबर २०२२ ०.३%
मार्च २०२३ ३.१%
१०-१५% कपात कंपन्यांनी वस्तूंच्या किमतींत केली आहे.
या कंपन्याही नाहीत मागे
हिंदुस्तान युनिलिव्हरचे ऋतिक तिवारी यांनी सांगितले की, विक्रीत प्रतिस्पर्धी म्हणून कायम राहण्यासाठी आम्ही किमती योग्य ठेवतानाच वस्तूचे प्रमाण वाढवीत आहोत. डाबर इंडियाचे मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, वृद्धीला गती देण्यासाठी कंपनी किमती कमी करण्याचा विचार करीत आहे.