येत्या काही तासांत 2024 ची सुरुवात होणार आहे. 2023 मध्ये वर्षी अनेक गोष्टींची चर्चा झाली. अलीकडेच स्विगीने सांगितले होते की, यावर्षी अनेक ग्राहकांनी त्यांच्या अॅपवरून बिर्याणीची सर्वाधिक ऑर्डर दिली होती. दरम्यान, आता 'ब्लिंकिट'नेदेखील यावर्षी कोणत्या वस्तुची सर्वाधिक ऑर्डर मिळाली, याची माहिती समोर आणली आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, यावर्षी ब्लिंकिटवर कंडोम, लायटर आणि पार्टी स्मार्ट टॅब्लेटसाठी सर्वाधिक ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनीच्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने 2023 मध्ये ब्लिंकिटवरून 9,940 कंडोम ऑर्डर केले. याशिवाय, 2023 मध्ये गुरुग्राममधून 65,973 लाइटरची ऑर्डर मिळाली. याशिवाय, या वर्षात अंदाजे 30,02,080 PartySmart गोळ्या (मद्यपान केल्यानंतर सकाळी हँगओव्हर टाळण्यासाठी) ऑर्डर करण्यात आल्या आहेत.
मध्यरात्री मॅगीची ऑर्डरमध्यरात्रीची भूक भागवण्यासाठी सुमारे 3,20,04,725 मॅगी पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. एका ग्राहकाने तर एका ऑर्डरमध्ये 101 लिटर मिनरल वॉटर खरेदी केले. यावर्षी ब्लिंकिटच्या माध्यमातून 80,267 गंगाजलाच्या बाटल्याही मागवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, बंगळुरुमधील एका ग्राहकाने 1,59,900 रुपये किमतीचा आयफोन 15 प्रो मॅक्स, लेजचे पॅकेट आणि सहा केळी ऑर्डर केली.
याशिवाय, वर्षभरात सकाळी 8 वाजेपूर्वी सुमारे 351,033 प्रिंटआउट्स, 1,22,38,740 आईस्क्रीम आणि 8,50,011 आइस क्यूब पॅकेटसह 45,16,490 इनो पाऊचची ऑर्डर मिळाली. तसेच, ब्लिंकिटकडून एका महिन्यात कुणीतरी 38 अंडरवेअरदेखील ऑर्डर केले होते.