Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओऐवजी एअरटेलला ग्राहकांची पसंती, दरवाढीचा फटका

जिओऐवजी एअरटेलला ग्राहकांची पसंती, दरवाढीचा फटका

नोव्हेंबर महिन्यात रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:05 AM2022-04-01T09:05:19+5:302022-04-01T09:05:59+5:30

नोव्हेंबर महिन्यात रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केल्याचा परिणाम

Customers prefer Airtel over Jio, price hike hits | जिओऐवजी एअरटेलला ग्राहकांची पसंती, दरवाढीचा फटका

जिओऐवजी एअरटेलला ग्राहकांची पसंती, दरवाढीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केल्याने तेव्हापासून जिओच्या ग्राहकसंख्येत झपाट्याने घट होत आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी  ॲथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)ने सादर केलेल्या अहवालानुसार, जिओने जानेवारी २०२२ मध्ये जवळपास १ कोटी ग्राहक गमावले आहेत. जिओसोबतच व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलची ग्राहकसंख्याही कमी होत  आहे. या महिन्यात मात्र भारती एअरटेलचा फायदा झाला असून, एअरटेलने जानेवारीमध्ये ७ लाख १४ हजार ग्राहक जोडले आहेत. 

ट्रायने व्हायरलाईन सबस्क्रायबर बेसचे आकडेही प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार जिओने जानेवारीत सर्वाधिक ३,०८,३४० नवीन व्हायरलाईन सबस्क्रायबर जोडले आहेत. त्यानंतर भारती एअरटेलने ९४,०१० सबस्क्रायबर जोडले आहेत.

Web Title: Customers prefer Airtel over Jio, price hike hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.