Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओ देणार ग्राहकांना १२0 जीबी डाटा मोफत

जिओ देणार ग्राहकांना १२0 जीबी डाटा मोफत

मुकेश अंबांनी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना १२0 जीबी ४जी डाटा मोफत देण्याची तयारी

By admin | Published: March 28, 2017 12:50 AM2017-03-28T00:50:53+5:302017-03-28T00:50:53+5:30

मुकेश अंबांनी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना १२0 जीबी ४जी डाटा मोफत देण्याची तयारी

Customers will get 120 GB data free | जिओ देणार ग्राहकांना १२0 जीबी डाटा मोफत

जिओ देणार ग्राहकांना १२0 जीबी डाटा मोफत

नवी दिल्ली : मुकेश अंबांनी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना १२0 जीबी ४जी डाटा मोफत देण्याची तयारी चालविली आहे. १ एप्रिलपासून कंपनीची पेड सेवा सुरू होईल. त्यात विविध योजनांखाली कंपनी वाढीव डाटा ग्राहकांना देणार आहे, असे समजते. सूत्रांनी सांगितले की, प्रीपेड प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी १४९ रुपये किमतीच्या रिचार्जवर २ जीबी अधिकचा डाटा मिळेल. त्याचप्रमाणे ३0३ रुपयांच्या प्लॅनवर दररोज ५ जीबी डाटा अधिक मिळेल. हा ५ जीबी डाटा मासिक २८ जीबी डाटाच्या व्यतिरिक्त असेल. ४९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्तीच्या रिचार्जवर १0 जीबी डेटा मोफत मिळेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Customers will get 120 GB data free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.