नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे कोणत्याही वस्तूचा पुरवठा थांबू नये, यासाठी विदेशातून येणाऱ्या वस्तूंना दिवसाचे आठवड्याचे सात दिवस आणि २४ तास सीमाशुल्क मंजुºया देण्याचे आदेश सर्व बंदरे, विमानतळे व देशांतर्गत कंटेनर डेपोंना देण्यात आले आहेत. मंजुºया रखडू नये, यासाठी सीमाशुल्क प्रयोगशाळाही दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहेत.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्डाने गुरुवारी तसे अधिकृत पत्रक काढले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर होण्याचा धोका आहे. तसे झाल्यास चीनमधून येणाºया कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या उद्योगांना फटका बसू शकतो, असे त्यात म्हटले आहे. चीनला होणाºया भारतीय निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. साथ आटोक्यात आल्यानंतर चीनशी आयात-निर्यात उच्चांकावर जाण्याचीही शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सीमाशुल्क मंजुºया २४ बाय ७ सुरू ठेवण्यात येत आहेत. मंजुऱ्यांची ही व्यवस्था मे, २०२० पर्यंत कायम राहील. औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन मंजुºया २४ बाय ७ सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
फ्रेट कॉरिडॉरवरील गर्दी होणार कमी
च्रेल्वेच्या मालगाड्यांचा वेग ताशी १०० कि.मी.केल्याने रेल्वेमार्गावरील मालवाहतुकीची गर्दी ७० टक्क्यांपर्यंत कमी होईल.
च्त्यातून मोकळ्या होणाºया रेल्वेमार्गांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जाईल, असे डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (डीएफसीसीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही मालवाहतूक वाढीसाठी प्रयत्नशील आहोत.
च्मात्र, रेल्वेची ७० टक्के वाहतूक आमच्या यंत्रणेकडे येईल, तेव्हा गतिमान व बंदे भारत या उच्च वेगाच्या प्रवासी गाड्या सुरू होऊ शकतील.