Join us

जूनमधील पतधोरणात होणार व्याजदरात कपात

By पूजा बोरकर | Published: May 09, 2019 4:03 AM

येत्या जूनमधील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी कपात केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : येत्या जूनमधील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी कपात केली जाण्याची शक्यता आहे. महागाई आणि वाढत्या वित्तीय तुटीमुळे जूननंतर दर कपातीची संधीच मिळणार नसल्यामुळे जूनमध्येच व्याजदर कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेऊ शकते, असे एका अहवालात म्हटले आहे.आयएचएस मार्किट या संस्थेने हा अहवाल जारी केला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फेब्रुवारी आणि एप्रिलच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने प्रत्येकी २५ आधार अंकांची कपात केली होती.अहवालात म्हटले आहे की, २०२० च्या मध्यात रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात कठोरता आणली जाण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती मात्र दरकपातीला अनुकूल आहे. देशांतर्गत आणि जागतिक वृद्धी मंदावलेली आहे. महागाईचा दरही रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या आत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून आणखी एकदा व्याजदर कपात केली जाऊ शकते.अहवालात म्हटले आहे की, पतधोरणातील शिथिलतेमुळे बँकांच्या व्याजदरात कपात झालेली आहे. त्यातच निवडणुकीत वारेमाप खर्च झाला आहे. यामुळे २०१९-२० या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वृद्धीला पूरक वातावरण राहील. यंदाचा मान्सून सामान्यपेक्षा थोडा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे येणाऱ्या महिन्यांत अन्न व इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते. २०१९ च्या दुसºया सहामाहीत महागाईचा दर ५ टक्क्यांच्या वर जाईल. २०१९ मध्ये तो ४.२ टक्के, तर २०२० मध्ये ५.३ टक्के राहील.महागाई वाढणारअहवालात म्हटले आहे की, जूननंतर भारतातील स्थिती बदललेली असेल. वाढलेली महागाई आणि वर चढलेली वित्तीय तूट यामुळे व्याजदर कपातीला वावच राहणार नाही. २०२० च्या मध्यात पतधोरण कठोर होण्याची शक्यता असल्यामुळे जूननंतर २०१९ मध्ये कोणतीही व्याजदर कपात होणार नाही, असे दिसते.

टॅग्स :भारतभारतीय रिझर्व्ह बँक