Join us

३० देशांतील बँकांवर भीषण सायबर हल्ले

By admin | Published: February 16, 2015 12:27 AM

जागतिक पातळीवर ३० देशांतील १०० हून अधिक बँकांच्या कोट्यवधी डॉलरवर सायबर हल्ल्याच्या माध्यमातून डल्ला मारण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वॉशिंग्टन : जागतिक पातळीवर ३० देशांतील १०० हून अधिक बँकांच्या कोट्यवधी डॉलरवर सायबर हल्ल्याच्या माध्यमातून डल्ला मारण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संगणक सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या अहवालाच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त आले आहे. दीर्घ काळापर्यंत बँकिंग प्रणालीपर्यंत पोहोच असलेल्या हॅकिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून ३० कोटी डॉलरची अफरातफर केली आहे.