Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी

सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी

देशातील प्रत्येक घरात पीएनजी पोहचवण्याच्या उद्देशाने देशात पुरवठा पाइपलाइनचे जाळे उभारण्याचे काम सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 08:06 AM2023-08-31T08:06:06+5:302023-08-31T08:06:14+5:30

देशातील प्रत्येक घरात पीएनजी पोहचवण्याच्या उद्देशाने देशात पुरवठा पाइपलाइनचे जाळे उभारण्याचे काम सुरु आहे.

Cylinder free India soon, PNG will reach households in 6 years | सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी

सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी

नवी दिल्ली : नळाद्वारे पाण्याप्रमाणे प्रत्येक घरापर्यंत पाइपने नैसर्गिक गॅसची (पीएनजी) कनेक्शन्स पोहोचल्याने लाखो कुटुंबांना रोजच्या धावपळीत मोठा दिलासा मिळाला आहे.

घरातील गॅस सिलिंडर संपला की आता त्यांची धावपळ उडत नाही, बुकिंगसाठी ना कॉल करावा लागतो ना डिलिव्हरी येण्याची वाट पाहावी लागते. सरकार २०३० पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत पीएनजी कनेक्शन्स पोहोचविण्याच्या योजनेवर वेगाने काम करत आहे. 

देशातील प्रत्येक घरात पीएनजी पोहचवण्याच्या उद्देशाने देशात पुरवठा पाइपलाइनचे जाळे उभारण्याचे काम सुरु आहे. यासाठी ठिकठिकाणच्या राज्य सरकारी यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. अनेक राज्यांमध्ये याआधीच घराघरांत पीएनजी कनेक्शन देण्याचे काम सुरू केलेले आहे.

‘सीजीडी’ नेटवर्क काम पूर्ण करणार
देशभर घराघरात पीएनजी कनेक्शन देण्यासाठी सरकारने सीटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्याच्या नेटवर्कचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. अनेक शहरांमध्ये पीएनजी कनेक्शन देण्यात आली आहेत. 

६३० 
जिल्ह्यांमध्ये २०२८ पर्यंत पीएनजी पाइपलाइन पोहोचविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

३३,५९२  
किलोमीटर लांबीचे गॅस पाइपलाइनचे जाळे यासाठी देशात तयार केले जाणार आहे. 

१२,२०६ 
किलोमीटरच्या पुरवठा 
पाइपलाइनचे काम सध्या 
युद्धपातळीवर सुरू आहे.

१२.५ 
कोटी पीएनजी कनेक्शन्स 
२०३० पर्यंत देशभरातील कुटुंबांना दिली जातील. 

१,१२,१३,६०२ 
कनेक्शन देशभरात आहेत. सर्वाधिक कनेक्शन गुजरातमध्ये, सर्वात कमी तेलंगणामध्ये आहेत.

Web Title: Cylinder free India soon, PNG will reach households in 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.