Join us

Cyrus Mistry Death : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 4:27 PM

Cyrus Mistry Accident Latest News & Updates : अहमदाबात येथून मुंबईच्या दिशेने जात असताना सूर्या नदीच्या  पूलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.

उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबात येथून मुंबईच्या दिशेने जात असताना सूर्या नदीच्या  पूलावर हा अपघात झाल्याची माहिती पालघरच्या पोलीस अधीक्षकांडून देण्यात आली. ते आपल्या मर्सिडिज कारमधून प्रवास करत असल्याचं समोर आली आहे. त्यांची गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल यांचा मृत्यू झाला. तर अनायता पंडोल आणि दरीयस पांडोल जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं म्हटलंय. आपल्याला अद्यापही यावर विश्वास बसत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांकडूही शोक व्यक्तटाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबीयांची नव्हे तर, देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली.

चौकशीचे आदेशया घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी तसेच कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. महामार्गावर सूर्या ब्रीजजवळ झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघा जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही गाडी महिला चालवत होती. चालक महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या अपघाताबाबत अधिक तपास कासा पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी सचिन नावाडकर यांनी दिली.कसा होता प्रवास?सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचे सुपुत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमधघून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंपीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता.

टॅग्स :सायरस मिस्त्रीटाटा