Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवला, आदेश जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवला, आदेश जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:06 PM2023-08-17T12:06:25+5:302023-08-17T12:10:35+5:30

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

da hike for bank employees from august 2023 to october 2023 iba order | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवला, आदेश जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवला, आदेश जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवल्याचे जाहीर केले. बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे. बँक कर्मचार्‍यांना महागाई भत्ता आणि बँक पेन्शनधारकांना महागाई सवलत ११ नोव्हेंबर २०२० रोजी बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात झालेल्या ११ व्या द्विपक्षीय समझोत्याअंतर्गत केली जाते. लेबर ब्युरो ऑफ इंडियाने जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक क्रमांकाच्या आधारे महागाई भत्ता निश्चित केला जातो.

SBI मध्ये मोफत उघडू शकता Salary Account, फ्रीमध्ये मिळतील लाखो रुपयांचे फायदे

ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीसाठी बँकर्ससाठी महागाई भत्ता जारी करण्यात आला आहे. हे एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीतील CPI क्रमांकांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आधारभूत वर्ष २०१६ सह CPI डेटाच्या आधारावर निर्णय घेण्यात आला.

बँक कर्मचाऱ्यांना सध्याच्या ५९६ डीए स्लॅबच्या तुलनेत ६३२ डीए स्लॅब दिला जाईल. म्हणजे एकूण ३६ डीए स्लॅबचा बूम त्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांचा दर ४४.२४ टक्के झाला आहे. मे ते जुलै २०२३ पर्यंत ४१.७२ टक्के डीए दिला जात होता. एकूण २.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: da hike for bank employees from august 2023 to october 2023 iba order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.