Lokmat Money > बिझनेस न्यूज > DA Hike Updates: या महिन्यात कर्चाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत सरकार, वेतनात वाढ कधी?

DA Hike Updates: या महिन्यात कर्चाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत सरकार, वेतनात वाढ कधी?

सामान्यत: सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये बदल करते . मागच्या वेळी मार्च 2022 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 07:25 PM2022-09-17T19:25:40+5:302022-09-17T19:26:10+5:30

सामान्यत: सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये बदल करते . मागच्या वेळी मार्च 2022 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता.

da hike updates today know when government hike in dearness allowance narendra modi government cabinet | DA Hike Updates: या महिन्यात कर्चाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत सरकार, वेतनात वाढ कधी?

DA Hike Updates: या महिन्यात कर्चाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत सरकार, वेतनात वाढ कधी?

DA Hike Updates: केंद्रीय कर्मचारी त्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. गेल्यावेळी डीएमध्ये सहा महिन्यांपूर्वी वाढ करण्यात आली होती. आता कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून पगारवाढीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये महागाईचा दर पुन्हा एकदा सात टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे डीए वाढीबाबत कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट देऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

याच महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार डीए वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. परंतु सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

किती होऊ शकते वाढ?
यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता (DA) हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा एक भाग आहे. सरकार ते सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देते. 28 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार डीए वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते, असे म्हटले जात आहे.

सहा महिन्यांनी होतो बदल
सामान्यत: सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये बदल करते. मागच्या वेळी मार्च 2022 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता. यानंतर डीए 34 टक्के करण्यात आला. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यास देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

किती वाढेल वेतन?
आठवा वेतन आयोग तूर्तास येणार नसल्याचे सरकारने निश्चितपणे स्पष्ट केले आहे. सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल. गणनेनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर त्याचा 34 टक्के दराने महागाई भत्ता 6,120 रुपये होतो. त्याच वेळी, 38 टक्क्यांनुसार, ते 6,840 रुपये होईल. सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिले जाते.

Web Title: da hike updates today know when government hike in dearness allowance narendra modi government cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.