- चिन्मय काळे
पीक भरपूर आल्याने केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या डाळींवरील आयातबंदी २०१८-१९ या वर्षासाठी कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायी निर्णय आहे, पण त्याच वेळी तीन महिन्यांनी सुरू होणाºया सणासुदीत डाळींचे दर सर्वसामान्यांनाही जेरीस आणण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये काही डाळींच्या कच्च्या मालावर आयातबंदी आणली होती, पण तयार डाळ आयात करण्यासंबंधी स्पष्ट निर्देश नव्हते. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात देशांतर्गत सर्वच डाळींचे पीक दमदार आले. यामुळे आता सरकारने आॅक्टोबर २०१७ च्या अधिसूचनेला दोनच दिवसांपूर्वी वर्षभरासाठी मुदतवाढ देत तयार डाळीचाही बंदीत समावेश केला.
केंद्र सरकारने आयातदारांसाठी कोटा मर्यादित केला आहे. हा कोटा तुरीसाठी ३ लाख, वाटाणासाठी १ लाख, तर उडद आणि मूगासाठी दीड लाख टन आहे, पण आता नवीन अधिसूचनेनुसार या कोट्यामध्ये कच्च्या मालासह तयार डाळीचाही समावेश आहे. हा शेतकºयांसाठी मोठा दिलासादायी निर्णय आहे. आतापर्यंत सरकारकडून स्पष्टीकरण येत नसल्याने, आॅस्ट्रेलिया, म्यानमार, कॅनडा, टांझानिया येथून तयार डाळींची आयात सुरू होती. त्यातून डाळींसाठी लागणाºया सर्वच कच्च्या पीकांचे दर आधारभूत किमतीच्याही खाली गेले आहेत. आता मात्र, आयातीचा कोटा संपला की, डाळ मिल मालकांना शेतकºयांचा माल खरेदी करावा लागेलच. त्यातून दरही चांगला द्यावा लागेल, असे मत डाळींचे आयात-निर्यात व्यापारी प्रताप मोटवानी यांनी व्यक्त केले.
असे वाढतील दर
बाजारात नवीन डाळींचे पीक हळूहळू येत आहेत. दर सध्या स्थिर आहेत. तूरडाळ ५५ ते ६५, हरभरा डाळ ६० ते ७०, उदडाची डाळ ६५ ते ७० रुपये प्रति किलोवर आहे, पण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या डाळींमध्ये आयातीत डाळींचाही समावेश आहे. आयातीचा कोटा लवकरच संपल्यावर, दोन ते तीन महिन्यांनी डाळींची चणचण भासू लागेल. डाळींची उपलब्धता कमी होऊन दर वाढतील, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
प्रमुख डाळींचे उत्पादन वाढले (लाख टनात)
डाळी यंदाचे उत्पादन मागणी
हरभरा १११ १०२-१०४
तूर ४० ३८-४०
मूग २६-२८ २५-२७
उडद १५-१७ १६-१८
वाटाणा ८-१० ५-७
एकूण २३५-२४० २२४-२२६
यंदाच्या सणासुदीत डाळी महागणार! आयातबंदी वर्षभर वाढविली
पीक भरपूर आल्याने केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या डाळींवरील आयातबंदी २०१८-१९ या वर्षासाठी कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायी निर्णय आहे, पण त्याच वेळी तीन महिन्यांनी सुरू होणाºया सणासुदीत डाळींचे दर सर्वसामान्यांनाही जेरीस आणण्याची शक्यता आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:52 AM2018-05-07T01:52:02+5:302018-05-07T01:52:02+5:30