Lokmat Money > बिझनेस न्यूज > वस्तू व सेवा करातील पुरवठ्याचा दांडिया आणि करदाते...

वस्तू व सेवा करातील पुरवठ्याचा दांडिया आणि करदाते...

कृष्णा, सध्या सर्वत्र नऊरात्रीचा उत्सव सुरू आहे. तरुण वर्ग रासदांडिया खेळण्यामध्ये मग्न आहे, तर मग जीएसटीमधील ‘पुरवठा’ या शब्दाला

By admin | Published: October 10, 2016 04:55 AM2016-10-10T04:55:37+5:302016-10-10T04:56:29+5:30

कृष्णा, सध्या सर्वत्र नऊरात्रीचा उत्सव सुरू आहे. तरुण वर्ग रासदांडिया खेळण्यामध्ये मग्न आहे, तर मग जीएसटीमधील ‘पुरवठा’ या शब्दाला

Dadaia and taxpayers supplying goods and services ... | वस्तू व सेवा करातील पुरवठ्याचा दांडिया आणि करदाते...

वस्तू व सेवा करातील पुरवठ्याचा दांडिया आणि करदाते...

अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, सध्या सर्वत्र नऊरात्रीचा उत्सव सुरू आहे. तरुण वर्ग रासदांडिया खेळण्यामध्ये मग्न आहे, तर मग जीएसटीमधील ‘पुरवठा’ या शब्दाला धरून वस्तू व सेवा यामधील दांडियाचा खेळ खेळला, तर काय होईल? याबद्दल सांग.
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटी मधील कर आकारणी ‘पुरवठा’ यावर अवलंबून आहे. जीएसटीमधील पुरवठ्याची व्याख्या ही सर्वात महत्त्वाची आहे, तसेच वस्तू व सेवा यांवर कर आकारणीचा वाद आधीपासूनचा आहे. म्हणजे, सध्या वस्तूवर व्हॅट तर सेवांवर सेवाकर आकारला जातो, परंतु अनेक वस्तू व सेवा एकत्रित असतात, त्यामुळे कर कोण लावणार, हा विवादाचा विषय आहे व यावर अनेक लवादसुद्धा आहेत. जीएसटीमध्ये पुरवठ्यानुसार वस्तू व सेवा यावर कर आकारणी होणार आहे. त्यामुळे वस्तू व सेवा यांच्यामधील पुरवठ्यानुसार दांडियाचा खेळ कसा रंगेल हे पाहू या!
अर्जुन: कृष्णा, जीएसटीमध्ये पुरवठ्याची (सप्लाय) व्याख्या काय आहे?
कृष्ण: अर्जुना, शासनाने मॉडेल जीएसटी कायद्या अनुसार पुरवठ्यामध्ये खाली गोष्टी मोडतील.
१) वस्तू किंवा सेवा- यांचा प्रत्येक प्रकारचा पुरवठा जसे: विक्री, देवाण घेवाण, भाडे, भाडेपट्टी, परवाना इ.
२) मोबदल्यासाठी किंवा त्या व्यतिरिक्त घेतलेली सेवा, प्रिंसीपल व एजंट यांच्यामधील वस्तू व सेवासाठी झालेला व्यवहार म्हणजेच, कमिशन एजंटसोबत केलेला व्यवहार, पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये मोडतो, तसेच कोणतीही सेवा बँडेड समूहाने दिली, तर ती पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये मोडते. उदा : अमेझॉन फ्लिपकार्ट.
अर्जुन: कृष्णा, वस्तूच्या पुरवठ्यामध्ये काय येते?
कृष्ण: अर्जुना,
१) कोणत्याही वस्तूच्या टायटलचे हस्तांतर म्हणजे वस्तूचा पुरवठा
२) जर करारपत्राद्वारे कोणत्याही वस्तूचे टायटल पुढील तारखेला पूर्ण मोबदला मिळाल्यावर दिले जाणार असेल, तर वस्तूच्या पुरठ्यामध्ये येते.
३) जर व्यवसायाच्या संपत्तीचा भाग असलेली एखादी वस्तू मालकाने सांगितल्याप्रमाणे हस्तांतरित केली किंवा वापरली व संपत्तीचा भाग राहणार नसल्यास, तसेच हे मोबदल्यासाठी असो वा नसो हे वस्तू पुरवठ्यामध्ये येईल.
४) कोणत्याही करपात्र व्यक्तीच्या संपत्तीची वस्तू जर व्यापाराचे देणे देण्यासाठी दिली, तर वस्तू पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येईल.
५) कोणत्याही नोंदणीकृत नसलेल्या असोसिएशन किंवा बॉडी आॅफ पर्सनने पुरवठा केलेली वस्तू हे वस्तूच्या व्याख्येमध्ये येते.
अर्जुन: कृष्णा, सेवाच्या पुरवठ्यामध्ये काय येते?
कृष्ण: १) कोणत्याही वस्तूचे टायटल हस्तांतरित न होता, दिलेली वस्तू सेवेच्या पुरवठ्यामध्ये येते.
२) कोणत्याही प्रकारची लीज टेनन्सी, जागा, व्यापारासाठीचे लायसन्स सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येते.
३) कोणत्याही प्रकारची लीज किंवा भाड्याने दिलेली इमारत उदा: इंडस्ट्रियल, कर्मशियल, रेसिडेन्सीअल किंवा त्याचा भाग किंवा पूर्ण असेल तर ते सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येते.
४) दुसऱ्या व्यक्तीच्या वस्तूंवर कोणतही प्रक्रिया केली असेल, तर सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येते.
५) व्यापाऱ्यासाठी लागणारी कोणतीही वस्तू जर मालकाने सांगितल्याप्रमाणे, व्यापाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी वापरली किंवा दुसऱ्याला दिली, तर सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येईल.
६) भाड्याने दिलेली अचल संपत्ती सेवा पुरवठ्यामध्ये येईल.
७) कॉम्प्लेक्स किंवा बिल्डिंगचे बांधकाम किंवा विक्रीसाठी कॉम्प्लेक्स वा बिल्डिंगचे बांधकाम जर मोबदला कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा ताबा जे आधी असेल, त्या आधी दिला तर सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येईल.
८) तात्पुरत्या वापरासाठी किंवा करमणुकीसाठी परवानगी दिलेले इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राइट सेवा पुरवठ्यामध्ये येईल.
९) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर जे डेव्हलमेंट, डिझाइन, प्रोग्रामिंग, अपग्रेडेशन इ. सेवा पुरवठ्यामध्ये येईल.
१०) वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, सेवा पुरवठ्यामध्ये येईल.
११) कोणतीही वस्तू वारण्याचा अधिकार मोबदल्यासाठी दिला असेल, तर तो सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येतो.
१२) जर कोणतेही अन्न, पेय किंवा माणसाच्या वापराची वस्तू मोबदल्यासाठी त्याची सेवा दिली, तर ती सेवा पुरवठ्याच्या व्याख्येमध्ये येते.
जीएसटीमधील तीन मूलभूत गोष्टी...
दांडिया खेळामध्ये जसे दोन दांडिया असतात, तसेच जीएसटीमध्ये वस्तूची एक व सेवाची दुसरी दांडी आहे. ज्या व्यक्तीच्या हातात दांड्या आहेत तो म्हणजे जीएसटीमधील पुरवठा. अनेक वेळा व्यवहार वस्तूचा की सेवेचा, यामध्ये भांडण होते, तसेच दांडियामध्ये दोन्ही दांड्यांनी खेळले जाते. जीएसटीमध्ये वस्तू, सेवा व पुरवठा या तीन मूलभूत गोष्टी आहे. यावरच संपूर्ण कर रचना, आकारणी अवलंबून आहे. त्यामुळे हे समजणे व त्यानुसार अंमलांत आणणे आवश्यक आहे. 

- उमेश शर्मा

 

Web Title: Dadaia and taxpayers supplying goods and services ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.