Join us

चण्याचे पीठ लवकरच महागेल ५ रुपयांनी! डाळही वधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:20 AM

देशी मालाला डोईजड होणा-या आॅस्ट्रेलियन हरभ-यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने २० टक्के वाढ केली. हा निर्णय शेतक-यांच्या हिताचा ठरणार असला, तरी बेसन मात्र किलोमागे ५ रुपयापर्यंत महागण्याची शक्यता आहे.

- चिन्मय काळेमुंबई - देशी मालाला डोईजड होणा-या आॅस्ट्रेलियन हरभ-यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने २० टक्के वाढ केली. हा निर्णय शेतक-यांच्या हिताचा ठरणार असला, तरी बेसन मात्र किलोमागे ५ रुपयापर्यंत महागण्याची शक्यता आहे.मागील वर्षी (२०१६-१७) हरभ-याचे पीक ९३ लाख टन होते. यंदा ते १११ लाख टनावर जात आहे. त्यात राज्याचा वाटा १९ लाख टन असेल. देशाची मागणी मात्र ९० ते ९५ लाख टनच आहे. तसे असतानाही १८ ते २० लाख टन हरभºयाची आयातही होत आहे. या सर्वाचा स्वदेशी मालाच्या किमतीवर परिणाम झाला आहे.हरभºयाचा हमीभाव ४,४०० रुपये प्रति क्विंटल (१५० रुपये बोनससह) आहे. मात्र, आयात डाळीसमोर स्वदेशी मालाचे दर ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलने घसरले आहेत. आॅस्ट्रेलियाहून येणाºया हरभºयाचा दर ३,९०० ते ४,००० रुपयांदरम्यान आहेत. आयात शुल्क आता ४० वरून ६० टक्के करण्यात आल्याने आस्ट्रेलियाचा हरभरा ४,२०० ते ४,३०० रुपये क्विंटल होईल. मात्र, त्यामुळे आपल्या शेतकºयांच्या डाळीला हमीभावापर्यंत दर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे डाळ व्यापा-यांचे म्हणणे आहे.म्हणून विदेशी हरभ-याला मागणीस्वदेशी हरभरा हा आयात केलेल्या हरभ-यापेक्षा ओला असतो. परदेशी हरभ-यातून १०० किलोमागे सुमारे ८२ किलो, तर स्वदेशी हरभ-यातून केवळ ७२ ते ७५ किलो डाळ मिळते. विदेशी हरभºयाचे सालही पातळ असते. यामुळेच विदेशी हरभºयाला मागणी अधिक आहे.आयातबंदी करासध्या हरभरा डाळीचा घाऊक दर ४,६०० ते ५,००० रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामध्ये देशी व आयातीत अशा दोन्ही हरभºयापासून तयार केलेल्या डाळींचा समावेश असतो. शुल्कवाढीनंतर आयात केलेल्या हरभºयाची किंमत वाढून डाळ मिल मालकांना भारतीय हरभराच हमीभावाने खरेदी करावा लागेल. त्यामुळे डाळींच्या दरात किलोमागे ५ ते ७ रुपये वाढ होऊन बेसन महाग होईल. मुळात उत्पादन अधिक असताना डाळीच्या आयातीची गरजच नाही. शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्यासाठी हरभºयावर पूर्ण आयातबंदी आवश्यक आहे.-प्रताप मोटवानी,डाळींचे आयात-निर्यात व्यापारी

टॅग्स :बाजारबातम्या