Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger Stock: बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर

Multibagger Stock: बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर

दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर गुरुवारी 6.57 टक्क्यांच्या तेजीसह 137.05 रुपयांवर पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 09:21 AM2022-12-30T09:21:52+5:302022-12-30T09:22:23+5:30

दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर गुरुवारी 6.57 टक्क्यांच्या तेजीसह 137.05 रुपयांवर पोहोचले आहेत.

Damani made a big investment in multibagger stock goldiam international share rose from 6 to 130 rupees | Multibagger Stock: बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर

Multibagger Stock: बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर

जेम्स अँड ज्वैलरी इंडस्ट्रीशी संबंधित एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. या कंपनीचे नाव आहे, गोल्डिअम इंटरनॅशनल (Goldiam International). या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर गेल्या काही वर्षांत 6 रुपयांवरून 130 रुपयांवर पोहोचले आहेत. दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर गुरुवारी 6.57 टक्क्यांच्या तेजीसह 137.05 रुपयांवर पोहोचले आहेत.

1 लाखाचे झाले 24 लाख रुपये -
गोल्डिअम इंटरनॅशनलचा (Goldiam International) शेअर 28 डिसेंबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 5.51 रुपयांवर होता. तो 29 डिसेंबरला 2022 रोजी 137.05 रुपयांवर पोहोचला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 28 डिसेंबर 2012 रोजी गोल्डिअम इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुतंवणूक केली असती आणि ती आजपर्यंत टीकवून ठेवली असती, तर आता त्याचे 24.87 लाख रुपये झाले असते. गोल्डिअम इंटरनॅशनलच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 209.41 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांतील लो लेव्हल 116.75 रुपये आहे.

दमानी आणि मुकुल अग्रवाल यांनी केलीय गुंतवणूक -
शेअर बाजारातील 2 दिग्गज गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, रमेश दमानी यांच्याकडे कंपनीचे 17,17,340 शेअर अथवा 1.58 टक्के वाटा. तर, मुकुल महावीर अग्रवाल यांच्याकडे 30,00,000 शेअर्स अथवा 2.75 टक्के वाटा आहे. मोनार्क नेटवर्थ कॅपिटलच्या नोव्हेंबर रिपोर्टमध्ये कंपनीच्या शेअर्सना बाय रेटिंग देण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या शेअरला 185 रुपयांचे टार्गेटही देण्यात आले आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1494 कोटी रुपे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Damani made a big investment in multibagger stock goldiam international share rose from 6 to 130 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.