सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : नव्याने चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट लवकरच बंद होणार आहे काय? रिझर्व बँकेने २ हजारांच्या नोटेचे मुद्रण थांबवण्याचे आदेश दिले आहेत काय? दुसºयांदा नोटाबंदीचा प्रयोग करण्याची योजना आहे काय? समाजवादी पक्षाच्या नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत हा सवाल उपस्थित केला. मात्र, सभागृहात उपस्थित अर्थमंत्री अरुण जेटलींनी यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर न देता, सूचक मौन पाळले.
नरेश अग्रवाल म्हणाले, रिझर्व्ह बँकेने आजपर्यंत ३.२ लाख कोटी रुपये मूल्याच्या २ हजारांच्या नोटा मुद्रित केल्या व आजवर चलनात आणल्या. आता आमच्या कानावर असे आले की, नव्याने चलनात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा लवकरच बंद होणार आहेत व त्याऐवजी १ हजार रुपयांची नाणी चलनात आणण्याचा सरकारचा इरादा आहे. संसदेचे अधिवेशन चालू असताना सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला, तर त्याची माहिती दोन्ही सभागृहांना दिली पाहिजे, अशी आजवरची परंपरा आहे. नोटाबंदीचा दुसरा प्रयोग तर सरकार करू इच्छित नाही?
अग्रवाल यांचे बोलणे थांबवित उपसभापती कुरियन म्हणाले, मुद्रण थांबविण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेने केली असेल, तर सरकारकडून याबाबत उत्तराची अपेक्षा कशी करता येईल? त्यावर काहीशा त्वेषाने अग्रवाल म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने विरोध केला असताना, नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला होता. ताजा निर्णयदेखील त्याच प्रमाणे सरकारनेच घेतला असेल, अशी शक्यता नाही काय?
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, विविध माध्यमातून आम्हाला दररोज बातम्या मिळतात की, सरकार लवकरच १00 रुपये, २00 रुपये आणि १ हजार रुपयांची नाणी चलनात आणण्याच्या तयारीत आहे. अधिवेशन सुरू असताना, केवळ बातम्यांद्वारेच हा निर्णय आम्हाला समजणार आहे काय? की यात तथ्य आहे? वास्तव काय? नोटांऐवजी नाणी चलनात आणली, तर बटवे घेऊन बाजारात हिंडावे लागेल. त्याची व्यवस्थाही करावी लागेल. द्रमुकचे तिरूची शिवा म्हणाले, माध्यमातल्या बातम्यांवर आमचा विश्वास नाही. मात्र, सरकारने या विषयाचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.
दोन हजारांच्या नोटा बंद होणार आहेत का?
नव्याने चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट लवकरच बंद होणार आहे काय? रिझर्व बँकेने २ हजारांच्या नोटेचे मुद्रण थांबवण्याचे आदेश दिले आहेत काय? दुसºयांदा नोटाबंदीचा प्रयोग करण्याची योजना आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:09 AM2017-07-27T03:09:13+5:302017-07-27T03:09:16+5:30