कोलकाता : दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या बंदमुळे चहा निर्यातीवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील काढणीच्या चहाला याचा फटका बसला आहे. दार्जिलिंग टी असोसिएशनचे बिनोद मोहन यांनी सांगितले की, ९ जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दुसऱ्या फ्लशचे उत्पादन झाले नाही. २०० कोटी रुपयांच्या नुकसानीच्या शक्यतेने निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बिनोद मोहन यांनी सांगितले की, दार्जिलिंगमधील चहाचे सर्व ८७ मळे बंद आहेत. ८५ लाख किलो उत्पादनाचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात काढल्या जाणाऱ्या चहाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे या चहाला अधिक किंमतही मिळते. यामुळे ग्राहकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. दार्जिलिंग टी असोसिएशनने याबाबत व्यापारी, टी बोर्ड, विविध संघटना आणि संबंधितांना पत्र लिहिले आहे.
दार्जिलिंगच्या आंदोलनाचा चहा निर्यातीवर परिणाम
दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या बंदमुळे चहा निर्यातीवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील काढणीच्या चहाला याचा फटका बसला आहे
By admin | Published: June 24, 2017 03:12 AM2017-06-24T03:12:28+5:302017-06-24T03:12:28+5:30