Join us  

Data Vouchers : १५ रुपयांत होणार डेली डेटा संपण्याचे टेन्शन दूर, धमाल आहेत हे प्लॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 3:59 PM

पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स.

एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) च्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन्स आहेत यात दररोज 3 GB पर्यंत डेटा मिळतो. त्याच वेळी, व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone-Idea) ग्राहकांना 4 GB पर्यंत दैनंदिन डेटासह अमर्यादित प्लॅन ऑफर करत आहे. हा डेटा ग्राहकांसाठी पुरेसा आहे, परंतु अनेकदा अधिक डेटाही खर्च होतो. अमर्यादित प्लॅनमध्ये, तुम्हाला दैनंदिन डेटा मिळण्यासाठी दुसऱ्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला खंड न पडता OTT आणि ऑनलाइन व्हिडिओंचा आनंद घ्यायचा असेल, तर 4G डेटा व्हाउचर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. विशेष म्हणजे ते फक्त 15 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहेत.

रिलायन्स जिओ व्हाऊचरJio आपल्या ग्राहकांसाठी चार स्वस्त 4G व्हाउचर ऑफर करते. हे डेटा व्हाउचर 15 रुपये, 25 रुपये, 61 रुपये आणि 121 रुपयांचे आहेत. 15 रुपयांच्या व्हाउचरमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी 1 GB डेटा मिळेल. त्याच वेळी, 25 रुपयांचे 4G डेटा व्हाउचर तुम्हाला 2 GB डेटा देईल. जर आपण 61 रुपयांच्या व्हाउचरबद्दल बोललो तर ते 6 GB डेटासह येते. त्याचप्रमाणे, कंपनी 121 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये एकूण 12 जीबी डेटा देत आहे. या डेटा व्हाउचरची वैधता जोपर्यंत तुमचा बेस प्लॅन असतो तोपर्यंत असते.

एअरटेलचे व्हाऊचरएअरटेलदेखील आपल्या ग्राहकांना काही उत्तम प्लॅन्स ऑफर करत आहे. कंपनीच्या 58 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये तुम्हाला 3 जीबी डेटा मिळेल, जो तुम्ही तुमच्या सक्रिय प्लॅनमध्ये ऑफर केलेला डेटा संपल्यानंतर वापरू शकता. कंपनी आपल्या 65 रुपयांच्या व्हाउचरमध्ये 4 जीबी डेटा देत आहे. एअरटेलच्या 98 रुपयांच्या डेटा व्हाउचरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी 5 जीबी डेटा मिळेल. एअरटेल 118 रुपयांचे डेटा व्हाउचर देखील देत आहे, जे 12GB डेटासह येते.

व्होडाफोन आयडिया व्हाऊचरव्होडाफोन आयडिया ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम डेटा प्लॅनदेखील ऑफर करत आहे. कंपनीच्या 19 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये तुम्हाला 24 तासांच्या वैधतेसह 1 GB डेटा मिळेल. त्याचप्रमाणे, कंपनी 51 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये 28 दिवसांसाठी 1GB डेटा देत आहे. 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरबद्दल बोलायचे तर यामध्ये तुम्हाला दोन दिवसांसाठी 2 GB डेटा मिळेल. 39 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये कंपनी 7 दिवसांच्या वैधतेसह 3 जीबी डेटा देत आहे. त्याचप्रमाणे, 108 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये तुम्हाला 15 दिवसांच्या इंटरनेट वापरासाठी 6 GB डेटा मिळेल. कंपनीचे 118 रुपयांचे डेटा व्हाउचर 28 दिवसांची वैधता आणि 12 GB डेटासह येते.

टॅग्स :एअरटेलरिलायन्स जिओव्होडाफोन आयडिया (व्ही)