Property Rules : देशात मालमत्तेवरुन वाद झाला नाही, असं एकही गाव शोधून सापडणारन नाही. उलट देशातील कोणत्याही न्यायालयात सर्वाधित खटले हे संपत्तीच्या वादाचेच पाहायला मिळतात. यामुळेच भारताच्या राज्यघटनेत मालमत्तेबाबत अनेक प्रकारचे कायदे व नियम करण्यात आले आहेत. यात बहुतेक वाद कौटुंबिक संपत्तीचे असतात. अनेकदा असे प्रसंग उभे राहतात की सूनच सासू-सासरे यांच्या मालमत्तेवर दावा सांगते. पण, अशा परिस्थितीत कायदा काय सांगतो, हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्या परिस्थितीत सून आपल्या सासरच्या मालमत्तेत हक्क सांगू शकते?
सासू आणि सासरे यांच्या मालमत्तेवर सून कधी दावा करू शकते?सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर सुनेचा हक्क आहे की नाही, हे मालमत्तेचा प्रकार आणि परिस्थिती यावर अवलंबून आहे. सासू-सासरे यांच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे, याबाबत अनेक कायदे करण्यात आले आहेत. सुनेला तिच्या पतीमार्फत सासू आणि सासरे यांच्या स्वकष्टाने कमावलेल्या मालमत्तेवर हक्क मिळतो. सासू आणि सासरे यांना त्यांची स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता त्यांच्या सुनेला द्यायची असेल तर ते तसे करू शकतात. पण, जर सासरच्या मंडळींना त्यांची संपत्ती सुनेला द्यायची नसेल, तर सून त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही. सासू आणि सासरे हे त्यांची कमावलेली मालमत्ता कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मृत्युपत्राद्वारे देऊ शकतात.
वाचा - ट्रम्प टॅरिफची दहशत! अमेरिका, जपान की भारत? कोणत्या देशाचं शेअर मार्केट सर्वाधिक कोसळलं?
सासू आणि सासरे यांच्या स्व-कष्टाच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार नाहीकायद्यानुसार एखाद्या कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर सून त्या संपत्तीवर दावा करू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतही सुनेला दोनच प्रकारे वाटा मिळू शकतो. जर तिच्या पतीने मालमत्तेतील त्याच्या वाट्याचे अधिकार तिच्या नावावर हस्तांतरित केले तर हे शक्य आहे. याशिवाय पतीच्या मृत्यूसारख्या परिस्थितीत सून वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकते. जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर तिच्या पतीच्या घरी जाते तेव्हा तिचा तिच्या सासरच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो.