नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २0१४ ते २0१९ या पाच वर्षांच्या कारकीर्दीत भारताचा एकूण कर आधार (टॅक्स बेस) दुपटीने वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.
‘भारत-अमेरिका रणनीतिक भागीदारी मंच’च्या (यूएसआयएसपीएफ) वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अरुण जेटली यांनी सांगितले की, मोदी सरकार सत्तेवर येण्याआधी देशातील ३.८ कोटी लोक आयकर विवरणपत्र भरत होते. आता ही संख्या ६.८ कोटींवर पोहोचली आहे. वित्त वर्ष २0१९च्या अखेरपर्यंत देशात ७.५ कोटी करदाते असतील, असे अपेक्षित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालू वित्त वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात थेट करांचे शुद्ध संकलन (परतावे दिल्यानंतर) १४ टक्क्यांनी वाढून ४.४४ लाख कोटी रुपये इतके झाले आहे. तर थेट करांचे सकल संकलन (परताव्यांसह) १६.७ टक्क्यांनी वाढून ५.४७ लाख कोटींवर पोहचले आहे.
कर संकलनात झालेल्या या वाढीमुळे अर्थसंकल्पीय तुटीपासून अर्थव्यवस्थेला थोडा दिलासा मिळाला आहे. वार्षिक आधारावर
कर परतावे ३0.४ टक्क्यांनी वाढून १.0३ लाख कोटी रुपयांवर गेले आहेत.
करपरताव्याचे प्रमाणही वाढले
जेटली यांनी सांगितले की, अप्रत्यक्ष करांचा नवा आराखडा आणि थेट करांच्या आराखड्यातील सुधारणा यामुळे कर संकलन वाढले आहे. जीएसटीमुळे देशाला लाभ झाला आहे. कर परतावे दाखल करण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांनी वाढले आहे.
'मोदींच्या कारकीर्दीत देशाचे करदाते दुप्पट होणार'
वित्तमंत्री अरुण जेटली यांचे प्रतिपादन; या वर्षात ७.५ कोटींपर्यंत वाढण्याची खात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:37 AM2018-10-31T05:37:40+5:302018-10-31T05:38:14+5:30