Join us

मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 8:20 AM

विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल. 

नवी दिल्ली : २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण (आयटीआर) दाखल करण्याची मुदत संपली. अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ६.७ काेटी आयटीआर दाखल झाले. शेवटच्या दिवशीच सुमारे ५० लाख लाेकांनी विवरण दाखल केले. आयटीआरसाठी काही दिवसांची मुदतवाढीची मागणी केली जात हाेती. मात्र, तसे झाले नाही. मुदतीनंतर दाखल करणाऱ्यांना १ ते १० हजार रुपयांपर्यंत विलंब शुल्क द्यावे लागेल. ३१ जुलैला सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३७ लाख आयटीआर दाखल झाले हाेते. 

पुढे काय?विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल. ...तर रवानगी तुरुंगात३१ डिसेंबरपर्यंत विवरण दाखल न करणाऱ्यांवर आयकर विभाग खटला दाखल करू शकते. त्यांना सहा महिने ते सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. उशिरा विवरण दाखल करणाऱ्यांची सखाेल तपासणी होऊ शकते. 

 

टॅग्स :इन्कम टॅक्सकर