Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ration Card : भारीच! रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारने केली 'ही' मोठी घोषणा 

Ration Card : भारीच! रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारने केली 'ही' मोठी घोषणा 

Ration Card : रेशन कार्ड लाभार्थ्यांना कमी खर्चात रेशन मिळते तसेच इतर अनेक फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:12 PM2022-03-26T16:12:17+5:302022-03-26T16:20:11+5:30

Ration Card : रेशन कार्ड लाभार्थ्यांना कमी खर्चात रेशन मिळते तसेच इतर अनेक फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे.

deadline for ration card linking with aadhar extended till 30 june 2022 ration card | Ration Card : भारीच! रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारने केली 'ही' मोठी घोषणा 

Ration Card : भारीच! रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारने केली 'ही' मोठी घोषणा 

नवी दिल्ली - रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. सरकारने लाभार्थ्यांना आणखी एक मोठी संधी दिली आहे. सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. लाभार्थी आता 30 जून 2022 पर्यंत त्यांचं रेशन कार्ड आधारशी लिंक करू शकतील. तुम्ही अजून देखील जर तुमचं रेशन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर लगेचच करा. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. 

रेशन कार्डमुळे मिळतात अनेक फायदे 

रेशन कार्ड लाभार्थ्यांना कमी खर्चात रेशन मिळते तसेच इतर अनेक फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील लाखो लोकांना लाभ मिळत आहे. रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्यासोबत अनेक फायदेही मिळतात. रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करून तुम्ही 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा लाभ घेऊ शकता. याद्वारे तुम्ही देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून रेशन मिळवू शकता.

असं आधार कार्डसोबत ऑनलाईन लिंक करा रेशन कार्ड

- सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- आता तुम्ही 'Start Now' वर क्लिक करा.
 - येथे तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल.
- यानंतर Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक करा.
- आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.
- ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- येथे OTP भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचा आधार व्हेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक केलं जाईल.

ऑफलाईनही करू शकता लिंक 

रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्डची प्रत, रेशन कार्डची प्रत आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनकार्ड केंद्रावर जमा करायचा आहे. याशिवाय तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन रेशनकार्ड केंद्रावरही केले जाऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: deadline for ration card linking with aadhar extended till 30 june 2022 ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.