Zee Entertainment Share Price: सोनी आणि झी एन्टरटेमेंन्ट यांच्यातील विलीनीकरणाचा करार तुटल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 23 जानेवारी रोजी सकाळी बाजार उघडला तेव्हा झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किचला पोहोचले. सकाळी 9.19 वाजता झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 208.60 रुपयांपर्यंत घसरले. मात्र, जसजसा कामकाज पुढे गेलं तशी शेअर्समधील घसरणही वाढली. दुपारी 12.37 वाजता झी एन्टरटेमेंन्टचे शेअर्स 26.58 टक्क्यांनी घसरून 169.90 रुपयांवर व्यवहार करत होते. याआधी सोमवारी स्टॉक एक्स्चेंजला हा करार तुटल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. येत्या काही दिवसांत झीच्या मूल्यांकनात मोठी घसरण होईल, असा अंदाज ब्रोकरेज कंपन्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेजनं झी एंटरटेनमेंटचे शेअर्स डाउनग्रेड केले आहेत.का तुटला करार?सोनीचा युक्तिवाद असा आहे की करार पूर्ण करण्याची अंतिम तारीख निघून गेली आहे. त्यानुसार विलीनीकरणाचा करार तोडण्यात आला आहे. एवढंच नाही तर कंपनीनं 9 कोटी डॉलर्सच्या टर्मिनेशन चार्जची देखील मागणी केली आहे. सोनीने आरोप केला आहे की झी नं मर्जर को-ऑपरेशन कराराचं (MCA) उल्लंघन केलं आहे, ज्यामुळे 9 कोटी डॉलर्सच्या दंडाची मागणी करण्यात आली आहे. तथापि, सोनी समूहानं 22 जानेवारी रोजी विलीनीकरण मागे घेण्याची घोषणा केली. नवीन संस्थेचं सीईओ पद कोण स्वीकारेल, ही विलीनीकरणातील मुख्य समस्या होती.
या विलीनीकरणावर 176.20 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विलीनीकरणाशी संबंधित कामावर 190.39 कोटी रुपये खर्च झाले आहेत. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, झी नं सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI), आरओसीसह (ROC) सर्व नियामकांकडून मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली. भागधारक आणि कर्जदारांकडून मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनीला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडून (NCLT) ग्रीन सिग्नल देखील मिळाला आणि कंपनीनं विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण केल्या होत्या, अशी माहिती झी नं नियामकाला दिली.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )