आज गुरुवार ३ ऑगस्टच्या सकाळीच अदानी समुहासाठी मोठी बातमी समोर आली आहे. अदानी समुहाने सिमेंट सेक्टरमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे, गौतम अदानी यांनी आता आपल्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका कंपनीचा समावेश केला आहे. अदानी समुहाची अंबुजा सिमेंट या कंपनीने आता सांघी सिमेंट कंपनीचे अधिग्रहन केल्याची घोषणा केली आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट सांघी इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांकडून ५६.७४ टक्के हिस्सा खरेदी करेल.
महिन्याला ५ हजारांची गुंतवणूक करून १५ वर्षांत मिळवू शकता २५ लाख, आजपासूनच सुरू करा गुंतवणूक
आठवड्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शेअर मार्केट सुरू होण्याअगोदर अदानी समुहाच्या या डीलची घोषणा केली. कंपनीने सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केल्याचे सांगितले. अंबुजा सिमेंटची डील ५००० कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रवर्तक समूह रवी सांघी अँड फॅमिलीकडून सांघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, हे संपादन संपूर्णपणे अंतर्गत स्रोतांमधून केले जाईल. या संदर्भात बोलताना गौतम अदानी म्हणाले की, या करारामुळे अंबुजा सिमेंटचा दर्जा बाजारपेठेत मोठा होणार आहे. या संपादनामुळे आम्ही २०२८ पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू. कंपनी सिमेंट उत्पादनात १४० एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सांघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे आणि अंबुजा सिमेंट सांघीपुरम येथील सिमेंट क्षमता पुढील २ वर्षांत १५ एमटीपीएपर्यंत वाढवेल.
या डीलची घोषणा होताच याचा परिणााम शेअर मार्केटवरही दिसून आला. अंबुजा सिमेंट या कंपनीच्या शेअरमध्ये परिणाम दिसून आला. अंबुजा सिमेंटच्या शेअर तेजीत आहे. शेअर बाजारात घसरण होऊनही अंबुजाचा शेअर वरती आहे. या कराराच्या घोषणेनंतर लगेचच अंबुजा सिमेंटचे शेअर्स गुरुवारी जवळपास एक टक्क्यांनी वाढून ४६६.६ रुपयांवर पोहोचले. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेले सांघी इंडस्ट्रीजचे एकात्मिक उत्पादन युनिट क्षमतेच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे सिमेंट आणि क्लिंकर युनिट आहे.