Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुन्या कारची डील करणाऱ्या OLX प्लॅटफॉर्मचीच विक्री; एवढ्या कोटींचा व्यवहार

जुन्या कारची डील करणाऱ्या OLX प्लॅटफॉर्मचीच विक्री; एवढ्या कोटींचा व्यवहार

कार ट्रेन कंपनीने सोमवारी ओएलएक्स ऑटोच्या युज्ड कार्सचा बिझनेस अधिग्रहण करत असल्याची घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:42 PM2023-07-12T12:42:36+5:302023-07-12T12:44:00+5:30

कार ट्रेन कंपनीने सोमवारी ओएलएक्स ऑटोच्या युज्ड कार्सचा बिझनेस अधिग्रहण करत असल्याची घोषणा केली

Deal done... OLX platform for buying and selling used cars, Stock market bullish | जुन्या कारची डील करणाऱ्या OLX प्लॅटफॉर्मचीच विक्री; एवढ्या कोटींचा व्यवहार

जुन्या कारची डील करणाऱ्या OLX प्लॅटफॉर्मचीच विक्री; एवढ्या कोटींचा व्यवहार

मुंबई - आपल्या प्लॅटफॉर्मवरुन जुन्या कारची खरेदी-विक्री करणारी कंपनी ओएलएक्स ऑटोचीच आता विक्री होत आहे. सध्या जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढीस लागत आहे. त्यात, दिग्गज मानले जाणारी कंपनी ओएलएक्स ऑटोचा बिझनेस विकला गेल्याची माहिती आहे. एका अहवालानुसार, सोबेक ऑटो इंडिया प्राइवेट लिमिटेड (OLX Auto Parent Company) कंपनीचा टेक कार ट्रेड (Car Trade) अधिग्रहण करणार आहे. ही डील ५३७ कोटी रुपयांत झाल्याची माहिती आहे. सोमवारी हा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली. 

कार ट्रेन कंपनीने सोमवारी ओएलएक्स ऑटोच्या युज्ड कार्सचा बिझनेस अधिग्रहण करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, मंगळवारी शेअर बाजारात सुरुवातीलाच या घोषणेचा परिमाण दिसून आला. दुपारी १२.३० वाजेपर्यंत कार ट्रेड कंपनीचे स्टॉक्स १७.३५ टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. शेअर मार्केटमध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीच्या शेअरचा भाव ८३ रुपयांच्या वाढीससह ५७१.९० रुपयांवर पोहोचला आहे. 

बाजारात २.६७ लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या ह्या कंपनीचा गेल्या ५२ आठवड्यातील सर्वात हाय शेअर रेंज ७३५.९५ रुपये एवढी आहे. तर, ५२ आठवड्यातील सर्वात कमी लेव्हलचा शेअर ३४०.१५ रुपये आहे. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईला देण्यात आलेल्या माहितीनुसार, कार ट्रेड कंपनीकडून ओएलएक्स इंडियाच्या ऑटो सेल्स डिव्हीजन सोबेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे १०० टक्के शेअर खरेदी केले जाणार आहेत. १० जुलै रोजी या व्यवहारासंबंधीचा करार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, कार ट्रेड ही मुंबईस्थित एक युज्ड कार्सचा प्लॅटफॉर्म आहे. कंपनीकडून महिनाभरात किंवा ३० दिवसांत सोबेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण केले जाणार आहे. 

दरम्यान, ओएलएक्स ग्रुपमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने आपल्या वर्कफॉर्समधील ८०० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तर, कंपनीकडून ऑटो बिझनेस विकण्यसााठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर, कार टेकसोबत कंपनीची डील निश्चित झाली. 
 

 

Web Title: Deal done... OLX platform for buying and selling used cars, Stock market bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.