Join us

उद्योगपती मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी; आता ४०० कोटींची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:18 AM

उद्योगपती मुकेश अंबानी यांना यापूर्वी दोनदा मेलद्वारे धमक्या आल्या असून दोन्ही वेळा खंडणीची मागणी करण्यात आली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना आठवडाभरात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने अंबानींकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. काल  सोमवार ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकी देणारा आणि या रकमेची मागणी करणारा एक मेल आला. याआधीही अंबानी यांना सलग दोनदा अशाच धमक्या आल्या होत्या, मात्र त्यानंतर कमी रकमेची मागणी करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

"आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

३० ऑक्टोबर सोमवारी मुकेश अंबानींना पुन्हा एक मेल आला. यामध्ये ४०० कोटी रुपये मागितले. याआधीही मुकेश अंबानींना याच मेल आयडीवरून दोनदा धमक्या आल्या होत्या आणि दोन्ही वेळा खंडणीची मागणी करण्यात आली होती. पहिली खंडणी २० कोटी रुपयांची मागणी २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती, तर दुसरी २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

पोलीस तपासात हा मेल आयडी शादाब खान नावाच्या व्यक्तीचा असून हा मेल बेल्जियममधून आल्याचे समोर आले आहे. हा त्या व्यक्तीचा बरोबर आयडी आहे का किंवा हे मेल फेक आयडीवरून पाठवले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.त्यासोबतच बेल्जियमच्या मेल प्रोव्हायडर कंपनीशीही संपर्क साधून त्यांच्याकडून या मेल आयडीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

पोलीस तपासात काय समोर आले? 

सलग तिसरी धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. मुकेश अंबानींना ज्या मेल आयडीद्वारे धमकी दिली जात आहे, तो शादाब खान नावाच्या व्यक्तीचा असून हा मेल बेल्जियममधून आल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. हा त्याच व्यक्तीचा आयडी आहे की बनावट आयडीवरून हे मेल पाठवण्यात आले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. यासोबतच पोलिस बेल्जियमच्या मेल प्रोव्हायडर कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याकडून या मेल आयडीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

धमकीच्या मेलमध्ये काय आहे?

आमचा एक स्नायपर पुरेसा आहे, मुकेश अंबानींना पाठवलेल्या तिसऱ्या मेलमध्ये खंडणीची रक्कम अनेक पटींनी वाढवली आहेच, पण मेलमधील धमकीची शैलीही कडक करण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे की, तुम्ही आमचे ऐकले नाही, आता रक्कम ४०० कोटी रुपये झाली आहे, तुमची सुरक्षा कितीही कडक असली तरी आमचा एक स्नायपर पुरेसा आहे. 

अंबानींना यापूर्वीही धमक्या आल्या आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले होते.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स