Lokmat Money > बिझनेस न्यूज > डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारात मोठी वाढ

डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारात मोठी वाढ

मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील व्यवहार यावर्षी सप्टेंबर महिन्यात ७४,०९० कोटी रुपयांचे झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:54 AM2017-11-20T04:54:02+5:302017-11-20T04:54:18+5:30

मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील व्यवहार यावर्षी सप्टेंबर महिन्यात ७४,०९० कोटी रुपयांचे झाले.

Debit, a big increase in credit card transactions | डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारात मोठी वाढ

डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारात मोठी वाढ

मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील व्यवहार यावर्षी सप्टेंबर महिन्यात ७४,०९० कोटी रुपयांचे झाले. सप्टेंबर २०१६ मध्ये हेच व्यवहार ४०,१३० कोटी रुपयांचे होते. त्यात तब्बल ८४ टक्के वाढ झाली. सरकारने रोखविरहित व्यवहारांना प्रोत्साहन देत आग्रह धरल्यामुळे ही वाढ झाली आहे, असे एका अभ्यासात म्हटले. पॉइंटस् आॅफ सेलवरील व्यवहार यावर्षी सप्टेंबरमध्ये ३७८ दशलक्ष होते, तर तेच गेल्या वर्षी २०३ दशलक्ष नोंदले गेले, असे युरोपियन पेमेंट सोल्युशन्स प्रोव्हायडर वर्ल्डलाइने रिझर्व्ह बँकेकडील माहितीचा आधार घेत साप्ताहिक अहवालात म्हटले.
मोदी सरकारने मागील वर्षी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सरकारने डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन दिले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम समाजाच्या सर्वच घटकातून व शहरी, ग्रामीण भागातून दिसत आहे.

Web Title: Debit, a big increase in credit card transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम