Join us

डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे नियम आजपासून बदलले, जाणून घ्या कसा पडणार प्रभाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:29 AM

जर आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेतलं आहे आणि त्याचा वापर 15 मार्चपर्यंत केलेला नसल्यास 16 मार्चला ते आपोआप निष्क्रिय होणार आहे.

ठळक मुद्देकारण आतापर्यंत ज्यांनी ऑनलाइन व्यवहारांसाठी कधीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरली नसतील, त्यांच्या कार्डांची सुविधा आजपासून अनिवार्यपणे थांबवली जाणार आहे. अशातच आपण नवीन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. जर आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेतलं आहे आणि त्याचा वापर 15 मार्चपर्यंत केलेला नसल्यास 16 मार्चला ते आपोआप निष्क्रिय होणार आहेत.

नवी दिल्ली : डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आतापर्यंत ज्यांनी ऑनलाइन व्यवहारांसाठी कधीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरली नसतील, त्यांच्या कार्डांची सुविधा आजपासून अनिवार्यपणे थांबवली जाणार आहे. अशातच आपण नवीन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. जर आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेतलं आहे आणि त्याचा वापर 15 मार्चपर्यंत केलेला नसल्यास 16 मार्चला ते आपोआप निष्क्रिय होणार आहेत.तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा परदेशात वापर करायचा असल्यास कस्टमर्स केअरला फोन करून किंवा मोबाइल ऍपच्या माध्यमातून माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर आपल्या कार्डची सेवा पुन्हा वेबसाइटच्या माध्यमातून पुन्हा सुरू केली जाणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडू लागल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 15 जानेवारीला यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यामध्ये ‘ऑनलाइन’ आणि ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’मधली सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांसंदर्भातला हा निर्णय घेण्यात आला होता.रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, विद्यमान कार्डासाठी, जारीकर्त्याने (कोणतीही देशी किंवा आंतरराष्ट्रीय बँक) सध्याच्या कार्डावरील ऑनलाइन आणि संपर्करहित व्यवहाराचे हक्क अक्षम करायचे की नाही, याचा निर्णय त्यांच्या जोखमीच्या आधारे घ्यायचा आहे. मात्र जी विद्यमान कार्डे ऑनलाइन, आंतरराष्ट्रीय किंवा संपर्कविहीन व्यवहारांसाठी कधीही वापरली गेली नसतील ती अनिवार्यपणे अकार्यक्षम करावी लागतील.