Join us

तुमचे डेबिट कार्ड कसे सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या, नाहीतर फसवणुकीला बळी पडू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 4:06 PM

Debit Card Tips: डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगणे तुमच्या हिताचे आहे.

नवी दिल्ली : डेबिट कार्डमुळे (Debit card) आपले आर्थिक व्यवहार अतिशय सोपे आणि सुविधाजनक झाले आहेत. तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली किंवा सेवा घेतल्यानंतर डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही त्याचे पैसे मोजता. पैसे काढण्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज भासत नाही. एटीएममधून (ATM) डेबिट कार्डाद्वारे चटकन पैसे काढता येतात. मात्र अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud)प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 

डेबिट कार्ड सुरक्षितपणे कसे वापरावे, याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगणे तुमच्या हिताचे आहे. याशिवाय, तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुमची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यासाठी आणि फसवणूक व ओळख चोरीचा धोका कमी करण्यासाठी देखील काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही सूचना देत आहोत, ज्याद्वारे डेबिट कार्ड सुरक्षित ठेवता येईल.

तुमच्या डेबिट कार्डची अशी करा सुरक्षा...- तुमचा पिन लक्षात ठेवा. डेबिट कार्डवर कुठेही लिहू नका आणि इतर कुठेही लिहू नका.- तुमचे डेबिट कार्ड सुरक्षित ठेवा, जसे की रोख रक्कम आहे.- एटीएममध्ये व्यवहार करताना तुमची पावती घ्या. तसेच बाहेरून कोणताही व्यवहार केल्यास तेथेच पावती घ्यावी.- कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर लगेच तक्रार करा. याबाबत माहिती बँकेलाही द्या.- व्यवहार करताना तुमच्या कार्डवर लक्ष ठेवा. तुमचे कार्ड एखाद्याला देणे म्हणजे त्यांना रोख देण्यासारखे आहे, म्हणून तुमचे कार्ड नेहमी सोबत ठेवा.- प्रत्येक खरेदीनंतर तुम्हाला तुमचे कार्ड परत मिळेल याची खात्री करा. व्यवहारादरम्यानच्या कोणत्याही गतिविधीमुळे तुम्हाला काळजी वाटत असल्यास, घटनेची तक्रार करण्यासाठी बँकेला ताबडतोब कॉल करा.- तुमचे बँक स्टेटमेंट वेळोवेळी तपासत राहा.- संशयास्पद वाटणाऱ्या कोणत्याही ठिकाणी डेबिट कार्ड कधीही स्वाइप करू नका.- तुमचे कार्ड कोणालाही देऊ नका. तुमचे डेबिट कार्ड कधीही नजरेआड होऊ देऊ नका.- ऑनलाइन व्यवहार करताना, तुमच्या डेबिट कार्डचे डिटेल्स कोठेही सेव्ह करण्यापूर्वी वेबसाइट सुरक्षित आहे की नाही ते तपासा.

टॅग्स :व्यवसाय