Join us  

बचत खात्यातून कर्जवसुली

By admin | Published: June 20, 2016 4:23 AM

स्मरणपत्रे पाठवूनही कर्जाचे हप्ते न भरणाऱ्या कर्जदाराच्या बचत खात्यातून बँकेने कर्जाची परस्पर वसुली करणे योग्य असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

चेन्नई : स्मरणपत्रे पाठवूनही कर्जाचे हप्ते न भरणाऱ्या कर्जदाराच्या बचत खात्यातून बँकेने कर्जाची परस्पर वसुली करणे योग्य असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.बचत खात्यातील आपल्या पेन्शनच्या रकमेतून थकित कर्जाची वसुली करण्यास एका राष्ट्रीयीकृत बँकेस मनाई करावी, यासाठी एका कर्जदाराने केलेली याचिका फेटाळताना न्या. एम. वेणुगोपाळ यांनी हा निर्वाळा दिला. (वृत्तसंस्था)