Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक एफडीपेक्षा डेट फंड्स ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या गणित 

बँक एफडीपेक्षा डेट फंड्स ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या गणित 

३०% ब्रॅकेटमध्ये एफडीवरील ७% परतावा करानंतर ५%च उरतो. याउलट डेट फंडावर २०% कर लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 05:52 AM2023-02-24T05:52:02+5:302023-02-24T05:52:32+5:30

३०% ब्रॅकेटमध्ये एफडीवरील ७% परतावा करानंतर ५%च उरतो. याउलट डेट फंडावर २०% कर लागतो.

Debt funds can be a better option than bank FDs;Know About | बँक एफडीपेक्षा डेट फंड्स ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या गणित 

बँक एफडीपेक्षा डेट फंड्स ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या गणित 

नवी दिल्ली - बँक एफडीच्या तुलनेत डेट फंड्स (कर्जरोख्यांच्या स्वरूपातील म्युच्युअल फंड) हे अधिक चांगला गुंतवणूक पर्याय असल्याचे जाणकारांचे मत आहे. याची अनेक कारणे आहेत. सध्या व्याजदर वाढल्यामुळे एफडीकडे गुंतवणूकदार आकर्षित हाेत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते सध्या डेट फंड हा चांगला पर्याय ठरू शकताे. यामागील कारणे समजून घेऊ या. 

डेट फंडातील परतावा ४० हजारांपेक्षा अधिक असल्यास १० टक्के टीडीएस कटत नाही. जो एफडीमध्ये कटतो. 

समान व्याजावर उत्तम परतावा

  • गुंतवणूक - १ लाख रुपये
  • व्याजदर - ७.५० %
  • कालावधी - ३ वर्षे
  • पक्वता रक्कम - १,२४,२३० रुपये
  • ३ वर्षांतील महागाई दर - १५%
 डेट फंड्सबँक एफडी
कर रक्कम१,८४६ रु७,२६९ रु
शुद्ध नफा  २२,३८४ रु.१६,९६१ रु. 
वास्तविक परतावा६.९६%५.३६% 

  

३०% ब्रॅकेटमध्ये एफडीवरील ७% परतावा करानंतर ५%च उरतो. याउलट डेट फंडावर २०% कर लागतो. डेट फंडांवर सध्या ६.५ टक्के ते ९ टक्के व्याज मिळते. एफडीवर ६ ते ७.५ टक्के व्याज मिळते. डेट फंडांवर लाभांशही मिळतो. एफडीवर तो नसतो. डेट फंडांत जेवढे अधिक दिवस गुंतवणूक राहील तेवढा कमी कर लागतो.

Web Title: Debt funds can be a better option than bank FDs;Know About

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.