Join us

Deccan Transcon Leasing IPO: १३ सप्टेंबरपासून खुला होणार 'हा' IPO, प्राईज बँड ₹१०८; ग्रे मार्केटमध्येही तगडा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 3:51 PM

Deccan Transcon Leasing IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंगमध्ये म्हणजेच आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमच्याकडे अनेक संधी असतील.

Deccan Transcon Leasing IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंगमध्ये म्हणजेच आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमच्याकडे अनेक संधी असतील. आम्ही तुम्हाला उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून म्हणजेच १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीओबद्दल सांगत आहोत. 

बुधवार, १८ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदार या इश्यूमध्ये गुंतवणूक करू शकतात. इश्यूसाठी प्राइस बँड १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलीये. डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंग आयपीओसाठी लॉट साइज १,२०० शेअर्सची आहे. ग्रे मार्केटमध्ये आज हा शेअर ३० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच हा शेअर लिस्टिंगवर हा शेअर २८ टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकतो.

काय आहेत अन्य डिटेल्स?

डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंगचा आयपीओ ६५.०६ कोटी रुपयांचा आहे, ज्यात प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या ५,५२४,००० इक्विटी शेअर्सचा एक फ्रेश इश्यू आणि ५००,००० इक्विटी शेअर्सचा ऑफर-फॉर-सेलचा समावेश आहे. युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंग आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम करते असून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून काम करत आहेत. गिरीराज स्टॉक ब्रोकिंग ही डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंग आयपीओसाठी मार्केट मेकर आहे.

डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंगची सुरुवात फेब्रुवारी २००७ मध्ये झाली. विविध उद्योगांमधील ग्राहकांना सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स तसंच भाडेतत्त्वावर टँक कंटेनर प्रदान करते.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार