नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये सकळ जीएसटी संकलन घसरून ९४,७२६ कोटींवर आले आहे. नोव्हेंबरमध्ये ते ९७,६३७ कोटी होते. जाणकारांच्या मते, जीएसटी संकलनातील घसरण हा चिंतेचा मुद्दा नाही. कारण एकूण जीएसटी व्यवस्थेचा कल आता स्थिरतेकडे संकेत करीत आहे.
आॅक्टोबरमध्ये संकलन प्रथमच १ लाख कोटींच्या वर गेले होते. आगामी महिन्यात ते याच पातळीवर राहील, असे तेव्हा मानले जात आहे. नंतर दोन महिन्यांत त्यात थोडी घसरण झाली असली, तरी ही स्थिती कायम राहणार नाही. महालेखापालांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये केंद्राने वित्तीय तुटीची मर्यादा ओलांडली, पण जाणकारांच्या मते, वित्त वर्षाच्या शेवटी तिमाहीत महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, सरकार खर्चातही व्यवहार्यता आणू शकते. त्यातून महसुलातील तूट भरून निघेल.
जीएसटी कर व्यवस्था स्थिरतेचे संकेत
करतज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या वर्षीची सरासरी मिळकत ८९ हजार कोटी होती. यंदा जीएसटी दरात कपात केली असतानाही सरासरी महसूल ९५ हजार कोटी ते ९६ हजार कोटींदरम्यान आहे. जीएसटी व्यवस्था स्थिर होत असल्याचा हा संकेत आहे.
डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन घसरून ९४,७२६ कोटींवर
डिसेंबरमध्ये सकळ जीएसटी संकलन घसरून ९४,७२६ कोटींवर आले आहे. नोव्हेंबरमध्ये ते ९७,६३७ कोटी होते. जाणकारांच्या मते, जीएसटी संकलनातील घसरण हा चिंतेचा मुद्दा नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:24 AM2019-01-03T01:24:32+5:302019-01-03T01:24:43+5:30