Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवरील बंदीचा निर्णय ३ महिन्यांसाठी पुढे ढकलला, १ नोव्हेंबरपासून लागू होणार

पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवरील बंदीचा निर्णय ३ महिन्यांसाठी पुढे ढकलला, १ नोव्हेंबरपासून लागू होणार

भारत सरकारनं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेटसह अशा सर्व उपकरणांच्या आयातीवर घातलेली बंदी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:21 AM2023-08-05T10:21:32+5:302023-08-05T10:21:55+5:30

भारत सरकारनं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेटसह अशा सर्व उपकरणांच्या आयातीवर घातलेली बंदी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे.

Decision on ban on import of PCs laptops and tablets postponed for 3 months effective from November 1 government notice | पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवरील बंदीचा निर्णय ३ महिन्यांसाठी पुढे ढकलला, १ नोव्हेंबरपासून लागू होणार

पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवरील बंदीचा निर्णय ३ महिन्यांसाठी पुढे ढकलला, १ नोव्हेंबरपासून लागू होणार

Computer, PC, Laptop Import Restriction: भारत सरकारनं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेटसह अशा सर्व उपकरणांच्या आयातीवर घातलेली बंदी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडनं (DGFT) सप्लाय चेन, दीर्घ करार इत्यादी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. आता ३ ऑगस्ट रोजी जारी केलेली अधिसूचना आता १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका...

या संदर्भात डीजीएफटीने एक अधिसूचना जारी केली आहे. कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट इत्यादी सर्व उपकरणांच्या आयातीवर बंदी घालण्याबाबत ३ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना ३१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा निर्णय १ नोव्हेंबरपासून लागू होईल म्हणजेच ३ महिन्यांसाठी वाढवण्यात आला असल्याचं यात नमूद करण्यात आलंय. यादरम्यान, कॉन्ट्रॅक्ट सप्लाय पूर्ण करण्यात यावा. येत्या २-३ दिवसात लायसन्स पोर्टल तयार होईल, त्यावर नोंदणी करण्यासही सांगण्यात आलंय.

भारतात लॅपटॉप आयात बंदी
३ ऑगस्ट रोजी भारत सरकारने लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व पर्सल कम्प्युटर्सच्या आयातीवर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला होता. कंपन्यांना लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर आणि टॅबलेट यांसारखी उपकरणे आयात करण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत भारतात अशा उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.

Web Title: Decision on ban on import of PCs laptops and tablets postponed for 3 months effective from November 1 government notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.