वॉशिंग्टन : द्विपक्षीय गुंतवणूक कराराबाबत (बिट) चालू असलेल्या चर्चेला वेग देण्यासाठी या कराराचा मसुदा भारताने अमेरिकेपुढे मांडला आहे. या करारावर भारतीय मंत्रिमंडळाने अद्याप मंजुरी दिलेली नाही.
अमेरिका-भारत व्यापार धोरणात मंचाची बैठक गुरुवारी येथे पार पडली. त्यात या मसुद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर त्यावर चर्चा करणे अधिक श्रेयस्कर ठरेल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना वाणिज्यमंत्री निर्मल सीतारामन म्हणाल्या की, या मसुद्यावर आमच्याशी सविस्तर चर्चा करण्याची अमेरिकेची तयारी आहे. या कराराच्या मसुद्याच्या प्रतींची देवाणघेवाण झाली.
एका प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भारत अमेरिकेच्या नोकऱ्या हिसकावून घेत नाही.
भारत-अमेरिका गुंतवणूक कराराचा मसुदा जाहीर
द्विपक्षीय गुंतवणूक कराराबाबत (बिट) चालू असलेल्या चर्चेला वेग देण्यासाठी या कराराचा मसुदा भारताने अमेरिकेपुढे मांडला आहे.
By admin | Published: October 30, 2015 09:38 PM2015-10-30T21:38:47+5:302015-10-30T21:38:47+5:30