Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी-चोकसीला फरार घोषित करा, ईडीची न्यायालयाला विनंती

मोदी-चोकसीला फरार घोषित करा, ईडीची न्यायालयाला विनंती

घोटाळेबाज हिरे व्यावसायिक नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांना फरार घोषित करण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष सत्र न्यायालयात केली आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार ईडीने ही विनंती केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:53 AM2018-07-12T05:53:05+5:302018-07-12T05:53:23+5:30

घोटाळेबाज हिरे व्यावसायिक नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांना फरार घोषित करण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष सत्र न्यायालयात केली आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार ईडीने ही विनंती केली आहे.

Declare Modi-Choksheela absconding, ED court's request | मोदी-चोकसीला फरार घोषित करा, ईडीची न्यायालयाला विनंती

मोदी-चोकसीला फरार घोषित करा, ईडीची न्यायालयाला विनंती

मुंबई : घोटाळेबाज हिरे व्यावसायिक नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांना फरार घोषित करण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष सत्र न्यायालयात केली आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार ईडीने ही विनंती केली आहे.
पंजाब नॅशनल बँकेतून लेटर आॅफ अंडरटेकिंगद्वारे घेतलेले १३,५०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत ठेवून नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी विदेशात पोबारा केला. या महाघोटाळ्यानंतर केंद्र सरकारने अध्यादेश काढला. त्यानुसार, १०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवून सहा महिन्यांपासून विदेशात पलायन केलेल्यांना ‘फरार’ घोषित करण्याचा अधिकार तपास संस्थांना देण्यात आला आहे. अशा घोटाळेबाजांना ‘फरार’ घोषित केले की, त्यांची जगभरातील मालमत्ता जप्त करून सुनावणी सुरू होण्याआधीसुद्धा विक्री अथवा लिलाव करण्याचे अधिकारही तपास संस्थांना आहेत.
नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी जानेवारीतच भारतातून पलायन केले आहे. न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर सहा आठवडे लोटल्यावरही हे दोघे सुनावणीसाठी उपस्थित झालेले नाहीत.
 

Web Title: Declare Modi-Choksheela absconding, ED court's request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.