Join us  

कर्जबुडव्या संदेसरा कुटुंबीयांना फरार घोषित करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:26 AM

विविध बँकांचे ८,१०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या संदेसरा कुटुंबीयांना फरार घोषित करा, अशी याचिका अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केली आहे.

नवी दिल्ली : विविध बँकांचे ८,१०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या संदेसरा कुटुंबीयांना फरार घोषित करा, अशी याचिका अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केली आहे. या कुटुंबातील तिघांनी बडोद्यात स्टर्लिंग बायोटेक या औषध कंपनीच्या नावे हे कर्ज घेतले होते.नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, नितीनची पत्नी दीप्ती संदेसरा व हितेश पटेल हे चौघे स्टर्लिंग बायोटेक समूहाचे प्रवर्तक होते. त्यांनी विविध बँकांकडून संयुक्तपणे कर्ज घेतले व विदेशात पळ काढला. दोन महिन्यांपूर्वी हे प्रकरण उजेडात आल्यानंतर ईडीने त्याचा तपास सुरू केला आहे.या चौघांनी कर्जाची परतफेड न करता, विदेशात पळ काढला. त्यामुळे त्यांना फरार आर्थिक गुन्हे कायद्यांतर्गत ‘फरार’ घोषित करावे, अशी विनंती ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यासंदर्भातील विशेष न्यायालयात केली आहे. याखेरीज संदेसरा कुटुंबीयांची ५ हजार कोटींची मालमत्ता ताब्यात आहे. या मालमत्तेच्या जप्तीची परवानगी द्यावी, असेही ईडीने याचिकेत म्हटले आहे.>नीरव मोदी, मल्ल्यासारखीच कारवाईईडीने या आधी विजय मल्ल्या व नीरव मोदी या दोन घोटाळेबाजांविरोधात अशीच याचिका केली होती. नंतर दोघांच्या मालमत्ता जप्त करता आल्या. संदेसरा प्रकरणही ईडी त्याच पद्धतीने हाताळत आहे, पण नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोक्सी व विजय मल्ल्याला अद्याप देशात परत आणता आलेले नाही. संदेसरा कुटुंबाच्या प्रत्यार्पणाबाबत ईडीला मेहनत घ्यावी लागणार आहे.