मुंबई : २०१७-१८ मध्ये त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत वाहनांच्या उत्पादन, विक्री व निर्यात या तिन्हीमध्ये वाढ झाली. पण व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत झालेली घट व प्रवासी वाहनांच्या विक्रीत समाधानकारक वाढ न झाल्याने मार्च २०१८ अखेर ६४,६९२ वाहनांचा साठा देशात पडून आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्टरर्स असोसिएशनने ही माहिती दिली आहे.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात देशात सर्व प्रकारच्या मिळून २ कोटी ५३ लाख ३० हजार ९६७ वाहनांचे उत्पादन झाले होते. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात १४.७८ टक्क्यांची वाढ होऊन २ कोटी ९० लाख ७५ हजार ६०५ वाहनांचे उत्पादन झाले. वाहन उत्पादनातील वाढीचा दर सरासरी ५ ते ७ टक्के असतो. २०१६-१७ मध्येही तो ५.४३ टक्केच होता. पण २०१७-१८ मध्ये यांत झालेली वाढ मोठी होती. उत्पादनाखेरीज वाहनांच्या देशांतर्गत विक्रीतही सरासरी १६.७० टक्क्यांची वाढ झाली. २.४९ कोटीहून अधिक वाहनांची देशांतर्गत विक्री झाली. २४.१९ टक्के ही सर्वाधिक वाढ तीन चाकींमध्ये झाली. संख्येनुसार दुचाकी सर्वाधिक विक्री झाल्या. पण प्रवासी वाहनांच्या विक्रीत केवळ ८.९ टक्क्यांचीच वाढ होऊ शकली.
निर्यातीत २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये १६.१२ टक्के वाढ झाली. एकूण ४०.३८ लाख वाहनांची निर्यात झाली. ही वाढ तीन व चार चाकी वाहन क्षेत्रात झाली. पण व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत १०.५३ टक्क्यांची घट झाली. परिणामी वर्षअखेर वाहनांचा साठा शिल्लक राहिला.
वाहनांची स्थिती अशी
वाहनाचा प्रकार २०१६-१७ २०१७-१८
दुचाकी १,७५,८९,५११ २,०१,९२,७५८
प्रवासी ३०,४६,७२७ ३२,८७.११४
व्यावसायिक ७,१४,२३२ ८,५६,४२८
तीन चाकी ५,११,६५८ ६,३५,४२८
एकूण विक्री २,१८,८२,१२८ २,४९,७१,९४९
एकूण उत्पादन २,५३,१४,४६० २,९०,७५,६०५
एकूण निर्यात ३४,७८,२६८ ४०,३८,९६४
६४ हजार वाहने विक्रीविना पडून , व्यावसायिक वाहने निर्यातीत घट
२०१७-१८ मध्ये त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत वाहनांच्या उत्पादन, विक्री व निर्यात या तिन्हीमध्ये वाढ झाली. पण व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत झालेली घट व प्रवासी वाहनांच्या विक्रीत समाधानकारक वाढ न झाल्याने मार्च २०१८ अखेर ६४,६९२ वाहनांचा साठा देशात पडून आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:00 AM2018-04-17T00:00:22+5:302018-04-17T00:00:22+5:30