Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाइन नोकऱ्यांत घट, स्टार्टअपमध्ये तेजी; जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे सावट

ऑनलाइन नोकऱ्यांत घट, स्टार्टअपमध्ये तेजी; जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे सावट

‘फाउंडइट इनसाइट्स ट्रॅकर’ (एफआयटी) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:34 AM2023-05-12T09:34:49+5:302023-05-12T09:35:05+5:30

‘फाउंडइट इनसाइट्स ट्रॅकर’ (एफआयटी) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Decline in Online Jobs, Boom in Startups; Low economic uncertainty around the world | ऑनलाइन नोकऱ्यांत घट, स्टार्टअपमध्ये तेजी; जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे सावट

ऑनलाइन नोकऱ्यांत घट, स्टार्टअपमध्ये तेजी; जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे सावट

मुंबई : जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे कंपन्यांसाठी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाल्यामुळे एप्रिलमध्ये संघटित क्षेत्रातील ऑनलाइन नोकरभरतीमध्ये घसरण झाली आहे. याउलट नावीन्याधिष्ठित स्टार्टअप कंपन्यांतील भरतीतील तेजी मात्र कायम असल्याचे आढळून आले आहे.

‘फाउंडइट इनसाइट्स ट्रॅकर’ (एफआयटी) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, एप्रिल २०२३ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत संघटित क्षेत्रातील ऑनलाइन भरतीमध्ये ६ टक्के घसरण झाली आहे.

जगात ‘व्हाइट गोल्ड’चा सर्वाधिक साठा कुणाकडे? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार ‘राजा’

ऑनलाइन भरतीत घसरण झाली असली तरी तरुणांना उगवत्या क्षेत्रांत नव्या संधी उपलब्ध होत आहेत. स्टार्टअपमध्ये विद्यमान रोजगारासह नवीन भरती दिसून येत आहे.

या क्षेत्रातही घट

शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रात भरती दिसून येत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हिस्सेदारी घटली आहे. आघाडीवर असलेल्या ५ क्षेत्रांत बँकिंग व वित्तीय सेवा तसेच वित्तीय तंत्रज्ञान आणि माध्यम व मनोरंजन क्षेत्राचा समावेश आहे. 

Web Title: Decline in Online Jobs, Boom in Startups; Low economic uncertainty around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी