Join us  

चटई उद्योगाला उतरती कळा;३० टक्के उत्पादन घटले

By admin | Published: September 24, 2015 11:55 PM

गेल्या दोन वर्षांपासून शेती हंगामाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे़ जळगावातील चटई उद्योगाच्या उत्पादनाचा ‘फेरीवाला’ म्हणजेच विक्रेतावर्ग हा बहुतेक

राम जाधव, जळगावगेल्या दोन वर्षांपासून शेती हंगामाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे़ जळगावातील चटई उद्योगाच्या उत्पादनाचा ‘फेरीवाला’ म्हणजेच विक्रेतावर्ग हा बहुतेक ग्रामीण भागातील व शेती क्षेत्राशी निगडित असल्याने, त्याचा थेट परिणाम या उद्योगावर होत आहे़गेल्या दोन वर्षांत या क्षेत्रातील ३० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन घटले आहे़ यावर्षी जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त फेरीवाले येथे खरेदीसाठी फिरकलेच नाहीत़ त्यामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वसाहतीमध्ये अनेक चटई निर्मात्यांकडे बराच तयार मालाचा साठा पडून आहे़ आशियातील सगळ्यात मोठा चटई व्यवसाय जळगावात आहे़ या उद्योगातील उत्पादनाचा विक्रेता (फेरीवाला) दारोदारी जाऊन चटईची विक्री करतो़ यातील बहुतेक जण चार महिने खरिपाच्या हंगामातून मिळालेला पैसा चटई खरेदी करण्यासाठी गुंतवतात व गल्लोगल्ली विकतात़मात्र, गेल्यावर्षी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर सततच्या होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे या शेतकरी वर्गातील फेरीवाल्यांकडून खरेदीचे प्रमाण घटले़ गेल्यावर्षीपासून ही परिस्थिती कायम असल्याने सततच्या आर्थिक अडचणींमुळे गुंतवणूक करण्यासाठी फेरीवाल्यांकडे सध्या पैसा उपलब्ध नाही़ तसेच त्यांनी असलेला थोडाफार पैसा पुन्हा शेतीतच गुंतवला आहे़ त्यामुळे निर्मित चटईला उठाव मिळत नसल्याने चटई उत्पादन व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे़ तसेच परराज्यात जाणारा माल होलसेल विक्रेत्यांकडूनही घेणाऱ्या फेरीवाल्यांच्या संख्येत घट झाल्याने त्या विके्रत्यांनीही मालाची खरेदी कमी केली आहे़ पडून असलेल्या मालाला दिवाळीपर्यंत चालना मिळण्याची अपेक्षा मॅट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नंदकुमार जैस्वाल यांनी व्यक्त केली आहे़विविध कारणांमुळे विदेशातील मागणी घटली आहे़ दुबई व सौदी राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय विक्री मार्केट आहे़ तेथे जाणारा माल जगभरात विविध देशांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो़ मात्र, सध्या जागतिक मंदीचे सावट व नायजेरिया, सुदान आणि इथिओपिया आदी देशांत असलेले अस्थिरतेचे वातावरण अशा कारणांमुळे चटई मालाची विदेशातील मागणी घटली आहे़ १०० टक्के निरुपयोगी व फेकलेल्या प्लास्टिकपासून ही चटई तयार केली जाते़ इतर राज्यांमध्ये वीजदर ५ ते ६ रुपये युनिट आहे, तर तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर ८ ते ९ रुपये युनिट असल्याने तो महाग आहे़ त्यातच पर्यावरणपूरक व्यवसाय असूनही या उद्योगावर विविध करांची आकारणी करून सरकारकडून व्यावसायिकांची पिळवणूक होत आहे़