Join us

बँकांच्या कुकर्जांमध्ये घट - सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:28 AM

केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशातील व्यावसायिक बँकांची कुकर्जे चालू वर्षात १.०२ लाख कोटींनी घटून ९.३४ लाख कोटींवर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशातील व्यावसायिक बँकांची कुकर्जे चालू वर्षात १.०२ लाख कोटींनी घटून ९.३४ लाख कोटींवर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, कुकर्जे कमी करण्यासाठी सरकारने व्यापक रणनीती आखली आहे. त्यातूनच पारदर्शक पद्धतीने एनपीए निश्चित करणे, कुकर्ज कमी करण्यासाठी सार्वजनिक बँकांमध्ये योग्य सुधारणा करून सशक्त बनवणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दिवाळखोरी संहितेच्या सहाय्याने पत पुरवठा करणारा आणि कर्जदार यांच्यातील नाते आमूलाग्रपणे बदलून टाकले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांकडून नियंत्रण काढून घेण्यात आले आहे. कर्जबुडव्यांना बाजारातून कर्ज घेण्यापासून रोखणे व त्यांना वसुली प्रक्रियेतून दूर ठेवणे आदी पावले उचलण्यात आली आहेत.