नवी दिल्ली : निर्यात सलग १३ व्या महिन्यात घटली आहे. जागतिक पातळीवर मागणीत घट झाल्यामुळे डिसेंबर २०१५ मध्ये निर्यात १४.७५ टक्के कमी होऊन २२.२ अब्ज डॉलरची झाली.आयातही गेल्या डिसेंबरच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या समीक्षाधीन कालावधीत ३.८८ टक्क्यांनी खाली येऊन ३३.९ अब्ज डॉलरची झाली. डिसेंबर २०१५ मध्ये व्यापारातील तोटा वाढून ११.६ अब्ज डॉलरचा झाला. तो डिसेंबर २०१४ मध्ये ९.१७ अब्ज डॉलर होता.वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर कालावधीत १८ टक्क्यांनी खाली येऊन १९.९ अब्ज डॉलर झाली. ती गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत २३९.९ अब्ज डॉलरची होती.
तेराव्या महिन्यातही झाली निर्यातीत घट
By admin | Published: January 19, 2016 3:09 AM